सुख म्हणजे नक्की काय असतं फेम माधवी निमकरचा सोशल मीडियात धुरळा (photos) | पुढारी

सुख म्हणजे नक्की काय असतं फेम माधवी निमकरचा सोशल मीडियात धुरळा (photos)

पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ ही मालिकेने अल्पावधीतच चाहत्यांच्या मनात घर केले आहेत, ही मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर येवून ठेपली आहे. यात गौरीची भूमिका साकारणारी गिरीजा प्रभूला मोलकरणीन व्हावे लागले आहे. याशिवाय यातील आणखी एक खास पात्र म्हणजे. शालिनी वहिनी अर्थात माधवी निमकर ( Madhavi Nimkar )  होय. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या मालिकेतून ती बाहेर पडत असल्याचे वृत्त समोर आले होते. परंतु, याला अधिकृत्त दुजोरा मिळालेला नाही. याच दरम्यान खास करून माधवी निमकरने आपल्या हटके फोटोंनी सोशल मीडियात धुरळा केला आहे.

माधवी निमकरने ( Madhavi Nimkar ) आपल्या इंन्स्टाग्रामवर नुकतेच साडीतील हटके फोटो शेअर केले आहेत. यात माधवी नारंगी रंगाच्या नऊवारीमध्ये खुलून दिसत आहे. या फोटोत तिने कपाळावर चंद्रकोरसोबत हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याचे दिसत आहे. यासोबत तिने आगामी चित्रपट येणार असल्याची माहिती दिली आहे.

या फोटोच्या कॅप्शमध्ये तिने ”पावनखिंड’ लवकरच तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात 🌸🌸 २१ जानेवारी २०२२..हर हर महादेव …’ असे लिहिले आहे. यावरून तिचा लवकरच ‘पावनखिंड ‘ येत असल्याची हुलकावणी मिळाली आहे. या चित्रपटात तिने मातोश्री गौतमाई देशपांडे यांची मुख्य भूमिका साकारली आहे. याआधी तिने एक फोटो इंन्स्टावर शेअर करून चित्रपटातील लूक शेअर केला होता. यावेळी तिने जांभळ्या रंगाच्या नऊवारी साडीत दिसली होती.

याच्याव्यक्तीरित माधवीचे काही हटके फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. नुकतेच तिने केलेल्या एका निळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटोंनी सोशल मीडियात धुरळा उडाला. ‘पावनखिंड’ चित्रपटातील नऊवारीनंतर चाहत्यांनी हा हटके लूक पाहायला मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा चित्रपट २१ जानेवारी २०२२ भेटीस येत आहे.

निळ्या रंगाच्या फोटोला तिने ‘Feeling a little blue 💙💙💙’ अशी कॅप्शन लिहिली आहे. या फोटोत ती लाल रंगाच्या कार्पेटवर असून एक पर्स देखील कॅरी केली आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी तिच्या लूकचे भरभरून कौतूक केलं आहे. यात एकाने ‘तू कोणता पण लूक कर, खूप छान दिसतेस’, ‘सुंदर दिसत आहेस ❤️😍🥰🥰😘🌈🧿’, तर दुसऱ्याने ‘अरेरे खूपच खतरनाक’ अशा कॉमेंन्टस दिल्या आहेत. तिसऱ्या एकाने ‘मृगणायनी माधवी❤️❤️❤️❤️’ असे लिहिले आहे. याशिवाय चाहत्यांनी फायर आणि हार्ट ईमोजी शेअर केले आहेत.

माधवी निमकर नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या तिची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asata) ही मालिका गाजत आहे, यातील तिची भूमिका चाहत्यांच्या पसंतील उतरली आहे.

या मालिकेने सध्या एक वेगळे वळण घेतले असून शालिनी वेडी झाल्याचे दाखवण्यात आले आहे. परंतु, खरोखरचं शालिनी वेडी झाली आहे का?, का ती नाटक करत आहे. याबाबतची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याशिवाय माधवी आगामी ”पावनखिंड ‘ या चित्रपटासाठी या मालिकेतून बाहेर पडत आहे का? यांचा ही खुलासा अजून व्हायचा आहे. त्यामुळे या मालिकेबद्दल चाहत्यांना पडलेल्या प्रश्नाचा उलघडा नव्या वर्षात म्हणजे. २०२२ रोजी होणार आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button