हनिमूनच्या रात्री बायकोच्या पोटात आली कळ, सत्य समोर येताच नवऱ्याच्या पायाखालची वाळू सरकली! | पुढारी

हनिमूनच्या रात्री बायकोच्या पोटात आली कळ, सत्य समोर येताच नवऱ्याच्या पायाखालची वाळू सरकली!

मेरठ; पुढारी ऑनलाईन

उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर नववधू सासरच्या घरी पोहोचली तेव्हा हनिमूनच्या रात्री तिच्या पोटात दुखू लागले. वधूच्या पोटात अचानक दुखू लागल्याने वरालाही चांगलाच त्रास झाला. तिला तातडीने वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले.

त्या ठिकाणी डॉक्टरांनी पोटदुखीच्या तक्रारीची तपासणी केली असता धक्कादायक बाब समोर आली. तपासाअंती डॉक्टरांनी वराला आणि त्याच्या कुटुंबीयांना जे सांगितले ते ऐकून जणू त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टरांनी सांगितले की वधू पाच महिन्यांची गरोदर आहे आणि गर्भात दोन गर्भ वाढत आहेत. त्यानंतर एकच खळबळ उडाली. वराच्या बाजूने खोटारडेपणाचा आरोप करत फिर्याद देण्यात आली आहे.

खरखौदा येथील पिपलीखेडा येथील रहिवासी असलेल्या या तरुणाचा विवाह २५ डिसेंबर रोजी लिसाडी गेट येथे राहणाऱ्या तरुणीसोबत झाला होता. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी तरुण वधूसोबत त्याच्या घरी पोहोचला. रात्री नवरीने पोटदुखीची तक्रार केली.

नातेवाईकांनी वधूची स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी केली असता ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. अल्ट्रासाऊंड केले असता गर्भात दोन गर्भ असल्याची पुष्टी झाली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. वधूच्या कुटुंबीयांना हा संपूर्ण प्रकार सांगितला आणि त्यानंतर वाद झाला. दोन्ही पक्षांमध्ये पंचायतही झाली.

१० लाखांची कथित मागणी

वधूच्या कुटुंबीयांनी आधी फसवणूक करून लग्न लावले आणि आता घटस्फोटासाठी १० लाख रुपयांची मागणी करत असल्याचा आरोप तरुणांनी केला आहे. यानंतर गुरुवारी तरुणाने एसएसपी मेरठ कार्यालयात तक्रार दाखल केली.

हे ही वाचलं का?

Back to top button