Kangana Ranaut Hrithik Roshan: 'आग भडकवण्याचे काम करू नकोस...' कंगना रणौतचा हृतिक रोशनला इशारा; नेमका वाद काय?

Kangana Ranaut Hrithik Roshan: हृतिक रोशनने 'We Need To Apologize To Hrithik Roshan' या ट्रेंडवर प्रतिक्रिया दिल्यानंतर कंगना रणौतने इंस्टाग्रामवरून त्याच्यावर पुन्हा निशाणा साधला.
Kangana Ranaut Hrithik Roshan
Kangana Ranaut Hrithik RoshanPudhari
Published on
Updated on

Kangana Ranaut Hrithik Roshan: अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या 'We Need To Apologize To Hrithik Roshan' या ट्रेंडवर हृतिकने प्रतिक्रिया दिल्यानंतर कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे त्याच्यावर जोरदार टीका केली. यावेळी तिने हृतिकची सध्याची मैत्रीण सबा आझाद हिचाही उल्लेख केला.

कंगनाने काय म्हटलं?

इंस्टाग्राम स्टोरीमध्ये कंगनाने लिहिले, "प्रिय हृतिक, मला आनंद आहे की तुला सबा आझादसारखी योग्य जीवनसाथी मिळाली आहे. तुम्ही दोघे एकत्र छान दिसता. आता तू एका नात्यात आहेस, त्यामुळे कोणत्याही महिलेचा छळ करणे किंवा तिला त्रास देणे तुला शोभत नाही."

तिने पुढे म्हटले की, "तुझ्या नावाचा वापर करून मला सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना तू थांबवायला हवे. आग भडकवण्याचे काम करू नकोस आणि तुझ्या जोडीदारालाही अशा गोष्टींमुळे अडचणीत आणू नकोस. आता तरी समजूतदारपणे वाग."

हृतिकने काय प्रतिक्रिया दिली होती?

अलीकडेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फ्रेडी बर्डी यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत "जगाने हृतिक रोशनची माफी मागायला हवी" असे म्हटले होते.

या पोस्टवर प्रतिक्रिया देताना हृतिकने लिहिले, "आता दुसरी व्यक्ती आवडत नाही म्हणून एकाच बाजूने उभे राहणे ही समाजातील मोठी समस्या आहे. एक दिवस या संपूर्ण प्रकरणावर योग्य संदर्भ आणि वस्तुस्थितीच्या आधारे चर्चा होईल, त्या दिवसाची मी वाट पाहत आहे." हृतिकच्या याच प्रतिक्रियेनंतर कंगनाने त्याला उद्देशून ही पोस्ट केली.

'We Need To Apologize To Hrithik Roshan' ट्रेंड का सुरू झाला?

हा ट्रेंड कंगना रणौत आणि CJP चे प्रवक्ते सौरव दास यांच्यातील सोशल मीडिया वादानंतर सुरू झाला. सौरव दास यांनी विनोदाने, "माझे मित्र मला यंग हृतिक रोशन म्हणतात," असे म्हटले होते.

यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सना 2016 मधील कंगना-हृतिक वादाची आठवण झाली. अनेकांनी पोस्ट शेअर करत त्या प्रकरणात हृतिकची बाजू योग्य असल्याचा दावा केला आणि 'We Need To Apologize To Hrithik Roshan' हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.

नेमका काय होता कंगना-हृतिक वाद?

कंगना आणि हृतिक यांच्यातील वाद 2016 मध्ये सुरू झाला. एका मुलाखतीत कंगनाने हृतिकचा उल्लेख "सिली एक्स" असा केला होता. त्यानंतर हृतिकने तिला कायदेशीर नोटीस पाठवत "आमच्यात कधीही प्रेमसंबंध नव्हते," असा दावा केला.

यानंतर दोघांमध्ये कथित ई-मेल्सवरूनही मोठा वाद झाला. हृतिकने आपल्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून कंगनाशी संवाद साधला गेला, असा दावा केला होता. तर कंगनाने हे ई-मेल्स स्वतः हृतिकनेच पाठवले असल्याचे सांगितले होते. हे प्रकरण अनेक महिने चर्चेत राहिले.

Kangana Ranaut Hrithik Roshan
CJP Protest Viral Reel: एक व्हायरल रील अन् 6 लाख फॉलोअर्स... CJPच्या आंदोलनातील एका रिलने बदललं 19 वर्षाच्या अभिनवचं आयुष्य

सबा आझादसोबत रिलेशनशिपमध्ये हृतिक

सध्या हृतिक रोशन अभिनेत्री आणि गायिका सबा आझाद हिला डेट करत आहे. दोघे अनेक सोशल मीडियावरील पोस्टमध्ये एकत्र दिसतात. हृतिकचे यापूर्वी इंटिरिअर डिझायनर सुजैन खान हिच्याशी लग्न झाले होते. 2014 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. मात्र, दोघेही आपल्या मुलांचे संगोपन एकत्रितपणे करत आहेत.

Kangana Ranaut Hrithik Roshan
Mahima Makwana: 'मुसाफिर कॅफे'च्या प्रीतीचं मराठी कनेक्शन; अभिनेत्री महिमा मकवाना म्हणाली, "मी पक्की मराठमोळी आहे"

आगामी चित्रपट

कंगना रणौत लवकरच आर. माधवनसोबत 'सर्कल' या चित्रपटात दिसणार असून तिचा 'क्वीन 2' हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हृतिक रोशन 'जेलर 2' या चित्रपटात दिसणार आहे. रजनीकांत मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट 15 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news