Spider Man BO: 'स्पायडर-मॅन'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! अवघ्या 2 दिवसांत 100 कोटी पार; 11 हॉलिवूड चित्रपटांचे विक्रम मोडले

Spider Man Brand New Day Box Office: मार्व्हलचा 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे' चित्रपट भारतात प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत 109.95 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Spider Man Brand New Day Box Office
Spider Man Brand New Day Box OfficePudhari
Published on
Updated on

Spider Man Brand New Day Box Office: मार्व्हल स्टुडिओचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे' बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. रिलीजच्या अवघ्या दोन दिवसांतच या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार करत अनेक हॉलिवूड चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. टॉम हॉलंड पुन्हा एकदा पीटर पार्करच्या भूमिकेत दिसत असल्याने चाहत्यांनी चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई

पहिल्याच दिवशी 60.60 कोटी रुपयांची दमदार ओपनिंग करणाऱ्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही जोरदार कमाई केली आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार, दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 49.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

भाषेनुसार दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन असे:

  • इंग्रजी: 28 कोटी रुपये

  • हिंदी: 17 कोटी रुपये

  • तामिळ: 2.25 कोटी रुपये

  • तेलुगू: 2 कोटी रुपये

  • कन्नड: 0.03 कोटी रुपये

  • मल्याळम: 0.07 कोटी रुपये

यासह चित्रपटाची दोन दिवसांची एकूण कमाई 109.95 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

Spider Man Brand New
Spider Man Brand New

11 हॉलिवूड चित्रपटांना टाकलं मागे

'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे'ने भारतातील कमाईच्या बाबतीत अनेक लोकप्रिय हॉलिवूड चित्रपटांना मागे टाकले आहे. या चित्रपटाने 'स्पायडर-मॅन: फार फ्रॉम होम'च्या 85.7 कोटी रुपयांच्या लाइफटाइम कलेक्शनलाही मागे टाकले आहे.

याशिवाय खालील चित्रपटांचे विक्रमही मोडले आहेत:

  • Fast X – 108.83 कोटी

  • Mission: Impossible – The Final Reckoning – 106.9 कोटी

  • Godzilla x Kong: The New Empire – 106 कोटी

  • F1 – 102.82 कोटी

  • Thor: Love and Thunder – 101.45 कोटी

  • Jurassic World – 101 कोटी

  • Jurassic World Rebirth – 100.56 कोटी

  • The Fate of the Furious – 86 कोटी

  • Spider-Man: Far From Home – 85.7 कोटी

  • Oblivion – 84.65 कोटी

  • Captain Marvel – 84.2 कोटी

या दमदार कामगिरीसह 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे' भारतात सर्वाधिक कमाई करणारा 16वा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

Spider Man Brand New Day Box Office
Mahima Makwana: 'मुसाफिर कॅफे'च्या प्रीतीचं मराठी कनेक्शन; अभिनेत्री महिमा मकवाना म्हणाली, "मी पक्की मराठमोळी आहे"

चित्रपटाची कथा काय आहे?

दिग्दर्शक डेस्टिन डॅनियल क्रेटन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात पीटर पार्करच्या आयुष्यातील नव्या संघर्षाची कथा दाखवण्यात आली आहे. संपूर्ण जग त्याला विसरून गेल्यानंतर तो पुन्हा एकदा आपले आयुष्य नव्याने उभे करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याचवेळी त्याच्या आयुष्यात एका नव्या आणि अत्यंत धोकादायक शत्रूची एंट्री होते.

Spider Man Brand New Day Box Office
New Marathi Movie|इतिहासातील क्रांतीची गाथा मोठ्या पडद्यावर; ‘पत्री सरकार १९४२’च्या पहिल्या पोस्टरची जोरदार चर्चा

चित्रपटात टॉम हॉलंड, झेंडाया, जेकब बॅटलन, जॉन बर्नथल आणि सॅडी सिंक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मार्व्हल चाहत्यांकडून मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे' येत्या काही दिवसांत भारतातील कमाईचे आणखी नवे विक्रम प्रस्थापित करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news