BS Avinash : केजीएफच्या ‘या’ अभिनेत्याचा झाला अपघात

kgf star b s avinash
kgf star b s avinash
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : यश स्टारर केजीएफच्या दोन्ही भागांमध्ये अँड्र्यूची भूमिका करणारा अभिनेता बीएस अविनाशचा (BS Avinash) अपघात झाला आहे. बुधवारी (२९ जून) बंगळुरूमध्ये त्याची कार ट्रकला धडकली. सुदैवाने, अभिनेत्याला गंभीर दुखापत झाली नाही. त्यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली असून त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. (BS Avinash)

अविनाशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले की, बुधवारी सकाळी तो त्याच्या मर्सिडीज-बेंझ कारने जिमला जात होता; पण एका वेगवान ट्रकने त्याच्या कारला धडक दिली. त्याने लिहिले, 'देवाच्या दयेने मला दुखापत झाली नाही. फक्त कारचे नुकसान झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by B.s. Avinash (@avinashbs)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. कारचा अपघात झाल्यानंतर आजूबाजूचे लोक तातडीने मदतीसाठी धावले आणि त्यांनी बीएस अविनाशला कारमधून बाहेर काढले.

साऊथ स्टार यशच्या केजीएफ मालिकेत अभिनेता अविनाशने स्थानिक टोळीचा बॉस अँड्र्यूची भूमिका साकारली होती. KGF च्या पहिल्या भागाच्या तुलनेत दुसऱ्या भागात त्याची भूमिका मोठी होती. मिळालेल्या माहितीनुसार, अविनाशला दिवंगत अभिनेता चिरंजीवी सर्जा यांच्या माध्यमातून KGF या सुपरहिट चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

चित्रपटासाठी खूप प्रशिक्षण घेतले

अविनाशने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, त्याने २०१५ पासून 'KGF: Chapter १' साठी प्रशिक्षण सुरू केले होते. केजीएफचा पहिला भाग रिलीज झाल्यानंतर अनेक ऑफर्स येऊ लागल्या, असा खुलासाही त्यांनी केला.

चाहत्यांना KGF ३ ची प्रतीक्षा 

KGF २ चे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले होते. यामध्ये संजय दत्तनेही खलनायकाची दमदार भूमिका साकारली होती. या चित्रपटात बॉलिवूडमधील रवीना टंडनचीही महत्त्वाची भूमिका होती. यात रॉकी भाई (यश) गोल्डमाईनचा राजा झाल्याची कथा दाखवण्यात आली होती. या चित्रपटाने वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिसवर १२०० कोटींची कमाई केली. आता त्याच्या पुढच्या भागाची तयारी सुरू आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by B.s. Avinash (@avinashbs)

 

View this post on Instagram

 

A post shared by B.s. Avinash (@avinashbs)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news