पुढारी ऑनलाईन डेस्क :
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक जण प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. बॉलीवूड 'क्वीन' अशी ओळख असणारी आणि नेहमीच वादग्रस्त विधान करुन चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावतने आता उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. ( Kangana Ranaut video ) याचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कंगनाने आपल्या इंस्टाग्राम अकांउटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने म्हटलं आहे की, १९७५ नंतरचा काळ हा भारतीय लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा काळ आहे. १९७५ मध्ये लोकनेते जेपी नारायण यांच्या गर्जनेने सिंहासन कोसळले होते. २०२० मध्ये मी म्हटलं होतं की, लोकशाही हा एक विश्वास आहे. सत्तेमुळे आलेल्या गर्वातून हा विश्वास तोडला गेला तर गर्वहरण होणे निश्चित आहे.
हनुमानाला भगवान शिवचा बारावा अवतार मानला जाते. शिवसेनेने हनुमान चालीसालाच बॅन केले. आता त्यांना भगावन शिवही वाचवू शकत नाहीत. एवढेच नाही तर तिने या व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले आहे की, 'जेव्हा पाप वाढते तेव्हा सर्वनाश होतो. त्यानंतर एक नवी सुरुवात होते.' कंगना रणावतच्या व्हिडीओवर सोशल मीडियावर नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
हेही वाचा :