पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री ते स्प्रिचुअल लीडर झालेल्या 'बिग बॉस' फेम सोफिया हयात रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोफिया (Sofia Hayat) उपवास करत होती. पण, तिची तब्येत इतकी खराब झाली की, ती बेशुध्द झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. सोफियाने सांगितल होते की, शरिराच्या स्वच्छतेसाठी ती उपवास आणि एनिमाची पध्दत वापरायची. यानंतर तिची प्रकृती खराब झाली. (Sofia Hayat)
सोफियाने आपल्या या परिस्थितीवर स्वत: चर्चा करत सांगितलं की-'मी उपवास आणि एनिमाच्या माध्यमातून शरिराच्या स्वच्छतेसाठी प्रॅक्टीस करत होते. मला वाटतं की, या प्रोसेस दरम्यान माझ्या शरिरातून अधिक मात्रा मध्ये सॉल्ट आणि इलेक्ट्रोलाईट्स निघून गेले. ही पातळी इतकी खालावली की, जे आरोग्यासाठी धोकादायक होतं. मला ५ पॅकेट्स सॉल्ट द्या, असे मी नर्सला म्हणाले.'
ती पुढे म्हणली की, 'मला रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली. मी थरथरत होते. मी माझ्या एका फ्रेंडसोबत बोलले. ती हीलर आहे , मग मला थोडं चांगलं वाटलं. मग, सेवटी उपवास सोडला. मला अन्न खावं लागलं, जेणेकरून माझ्या शरिराची उर्जेची गरज भागवू शकेन. मला नाही माहिती की, मी इतकी आजारी कशी झालीय. याआधीही २०१४ मध्येही मी उपवास कले होते. पण त्यावेळी मी ठिक होते.
सोफिया म्हणाली की, मागच्या वेळी तिला खूप चांगलं वाटत होतं. सोफियाची प्रकृती आता सुधारत आहे. रुग्णालयातून तिला सुट्टीदेखील मिळाली आहे. सोफियाने सांगितले की, यूकेच्या रुग्णालयातून मिळालेल्या बिलाने तिला धक्का बसला. सोफिया म्हणाली की, जेव्हा मी रुग्णालयात होते, तेव्हा त्यांनी माझ्या चेहऱ्यासमोर बि आणून ठेवलं होतं. पण, माझं यूकेमध्ये हेल्थ इन्श्योरेंस आहे.'