OTT Releases : जुलैचा हा आठवडा मनोरंजनाने भरपूर, तुम्ही काय पाहणार? | पुढारी

OTT Releases : जुलैचा हा आठवडा मनोरंजनाने भरपूर, तुम्ही काय पाहणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : आता लोग पूर्वीसारखं थिएटर्समध्ये चित्रपट रिलीज होण्याची प्रतीक्षा करत नाहीत. कारण OTT (OTT Releases) वर वेबसीरीज, चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रेक्षक आधीपासूनचं नियोजन करतात की, या वीकेंडला घरी बसून कोणता चित्रपट किंवा कोणती वेब सीरीज पाहायची आहे. आता चित्रपटांचशिवाय, डिजिटल प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट रिलीज होत आहेत. १ ते ८ जुलैपर्यंत ओटीटीवर रिलीज होणारे चित्रपट आणि वेब सीरीज विषयी जाणून घ्या. (OTT Releases)

१. धाकड

कंगनाचा ‘धाकड’ चित्रपट थिएटर्समध्ये मागील महिन्यात रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद म्हणावा तसा मिळाला नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप झाला. आता तो OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. तुम्ही हा चित्रपट सिनेमागृहात पाहिला नसेल, तर तुम्ही १ जुलै रोजी Zee5 वर पाहू शकता. याचे दिग्दर्शन रजनीश घई यांनी केले असून कंगना व्यतिरिक्त अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

२. मिया बीवी और मर्डर

‘मियां बीवी और मर्डर’ ही एक वेब सीरिज आहे. जी १ जुलै रोजी MX Player वर प्रसारित होणार आहे. हा एक क्रईम आणि कॉमेडी शो आहे, ज्यामध्ये राजीव खंडेलवाल, मंजरी फडणीस, रुशद राणा, प्रसाद खांडेकर आणि हृतिक दिनेश शाह सारखे स्टार्स दिसणार आहेत.

३. सम्राट पृथ्वीराज

अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज या महिन्यात रिलीज झाला होता. पण बॉक्स ऑफिसवर त्याचे नशीब खूपच वाईट होते. मिस वर्ल्ड २०१७ मानुषी छिल्लरने या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. हा चित्रपट १ जुलै रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित होत आहे.

४. स्ट्रेंजर थिंग्स सीजन ४ वॉल्यूम 2

स्ट्रेंजर थिंग्ज सीझन ४ खंड वॉल्यूम २ चा चौथा सीझन १ जुलै रोजी Netflix वर प्रवाहित होईल. या शोबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत.

५. ‘टर्मिनल लिस्ट’

‘द टर्मिनल लिस्ट’ १ जुलै रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज होईल. यात प्रसिद्ध अभिनेता ख्रिस प्रॅट मुख्य भूमिकेत आहे.

६. मूनफॉल

जर तुम्ही सायन्स फिक्शनसारख्या चित्रपटांचे किंवा शोचे चाहते असाल तर तुमच्यासाठी ‘मूनफॉल’ हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला चंद्र, पृथ्वी आणि अवकाशात खूप काही घडताना दिसेल, जे खूप रोमांचकारी आहे. याचे दिग्दर्शन Roland Emmerich यांनी केले आहे. यात Halle Berry, Patrick Wilson आणि John Bradley यांच्या भूमिका आहेत. तुम्ही ते १ जुलै २०२२ रोजी Lionsgate Play प्लेवर पाहू शकता.

७. ऑपरेशन रोमियो

शशांत शाह दिग्दर्शित ‘ऑपरेशन रोमियो’ हा रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट एप्रिल महिन्यात प्रदर्शित झाला आहे, परंतु आता तो ३ जुलै, २०२२ रोजी नेटफ्लिक्सवर येत आहे. यात शरद केळकर, भूमिका चावला आणि सिद्धांत गुप्ता यांच्यासह अनेक स्टार्स आहेत.

८. कॉफी विथ करण सीझन ७

करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा चॅट शो खूप लोकप्रिय आहे. त्याचा सातवा सीझन लवकरच दाखल होणार आहे. त्याचे प्रोमोही येऊ लागले आहेत. हा शो टीव्हीवर नव्हे तर ओटीटीवर येण्याची ही पहिलीच वेळ असेल. होय, तुम्ही ७ जुलै २०२२ पासून Disney Plus Hotstar वर हा शो पाहू शकता. यात चित्रपटसृष्टीतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

९. रणवीर वर्सेज वाइल्ड विथ बियर ग्रिल्स

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग लवकरच बेअर ग्रिल्सच्या लोकप्रिय शोमध्ये दिसणार आहे. हा शो ८ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर रणवीर Vs वाईल्ड विथ बेअर ग्रिल्स या नावाने प्रसारित होईल.

 

Back to top button