

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत साध्या भोळ्या 'राणा दा'ची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या हार्दिक जोशीचा आता एक 'खतरनाक' लूक समोर आला आहे. त्याच्या आगामी 'द ट्रॅप' (The Trap) या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये हार्दिकचा रांगडा पण तितकाच खतरनाक अंदाज पाहायला मिळतोय. हा एक सस्पेन्स ॲक्शन-थ्रिलर चित्रपट असल्याचे बोलले जात असून, हार्दिकला अशा वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
लोकप्रिय टीव्ही अभिनेता आणि 'तुझ्यात जीव रंगला' फेम हार्दिक जोशी (Hardeek Joshi) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'राणा दा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हार्दिकने आता मोठ्या पडद्यावर धमाका करण्याची तयारी केली आहे. त्याच्या आगामी 'द ट्रॅप' (The Trap) या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले असून, यात त्याचा कधीही न पाहिलेला 'स्वॅग' पाहायला मिळत आहे.
हार्दिकच्या बहुप्रतीक्षित 'द ट्रॅप' या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरवरील प्रत्येक पात्र काहीतरी लपवतंय.प्रत्येक चेहरा खरा आहे की मुखवटा हे ओळखणं कठीण होत जातं.
पोस्टरमधील 'खतरनाक' लूक
प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये हार्दिक जोशी अत्यंत गंभीर आणि आक्रमक भूमिकेत दिसत आहे. त्याच्या डोळ्यातील चमक आणि हातातील स्टाईल पाहून हा चित्रपट जबरदस्त ॲक्शनने भरलेला असेल, असा अंदाज लावला जात आहे.
सिनेसृष्टीला एक नवा आणि दमदार चेहरा मिळत आहे-अभिनेता सुजित जाधव. या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत सुजित आपले पदार्पण करत आहेत. चित्रपटात जेष्ठ आणि कसलेले अभिनेते मोहन जोशी, संजय खापरे, श्याम मोहिते, स्वाती लिमये ही कलाकार मंडळी दिसणार आहेत. ‘द ट्रॅप’ चित्रपटाची निर्मिती योगेश रामचंद्र जाधव, कथा आणि दिग्दर्शन अमोल लक्ष्मण खापरे यांनी केले आहे.
पटकथा संवाद आणि गिते अभिजीत रूपा राजेंद्र कोळेकर यांनी लिहले असून क्रिएटिव्ह दिग्दर्शक निरंजन पत्की, संगीत नितीन उगलमुगले यांचे आहे. कार्यकारी निर्माते रत्नेश पन्हाळकर, मेकअप विशाखा शिंदे आणि विशाल निघोळ यांचे आहे.
द ट्रॅप या चित्रपटातून एक वेगळी भूमिका मला साकारायला मिळाली आहे. आजवर अशा प्रकारची सस्पेन्स थ्रिलर दर्शविणारी भूमिका माझ्या वाटेला आली नाही आणि म्हणूनच या संधीचं मी सोनं करायचं ठरवलं
हार्दिक जोशी, अभिनेता
हा चित्रपट १० एप्रिल, २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.