Shraddha Kapoor Video: कोल्हापूरकरांचं प्रेम पाहून श्रद्धा कपूरच्या डोळ्यांत पाणी! म्हणाली, 'मी तुम्हाला एक सांगू...', नेमकं काय घडलं?

Shraddha Kapoor Kolhapur Video: अभिनेत्री श्रद्धा कपूरने आगामी 'ईठा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोल्हापूरला भेट दिली आणि अंबाबाईचं दर्शन घेतलं.
Shraddha Kapoor Kolhapur Video
Shraddha Kapoor Kolhapur VideoPudhari
Published on: 
Updated on: 

Shraddha Kapoor Kolhapur Video: अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी 'ईठा' (Eetha) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी श्रद्धा कपूर सध्या वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहे. नुकतीच तिने चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह कोल्हापूरला भेट दिली. या भेटीदरम्यान तिने अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी श्रद्धाचा मराठमोळा अंदाजही पाहायला मिळाला. लाल रंगाची नऊवारी साडी, केसांत गजरा आणि नाकात नथ अशा पारंपरिक वेशात ती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती.

मात्र, कोल्हापूर दौऱ्यातील सर्वाधिक लक्षवेधी क्षण ठरला तो म्हणजे कोल्हापूरकरांनी दिलेलं भरभरून प्रेम. चाहत्यांचा उत्साह आणि मिळालेलं प्रेम पाहून श्रद्धा कपूर चांगलीच भारावून गेली. चाहत्यांशी संवाद साधताना तिचे डोळे पाणावले. उपस्थितांचे आभार मानताना तिला आपल्या भावना आवरता आल्या नाहीत.

नऊवारी साडी, केसांत गजरा; श्रद्धाचा मराठमोळा अंदाज

कोल्हापूर दौऱ्यासाठी श्रद्धा कपूरने खास पारंपरिक लूक केला होता. लाल रंगाची नऊवारी साडी, आकर्षक दागिने, नाकात नथ आणि केसांत माळलेला गजरा यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसत होतं. तिच्या या मराठमोळ्या रूपाने चाहत्यांची मनं जिंकली. सोशल मीडियावरही तिच्या लूकचं कौतुक होत आहे.

Shraddha Kapoor Kolhapur Video
Panchayat Season 5: 'पंचायत 5'च्या शूटिंगनंतर गावाची दयनीय अवस्था; ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर श्रद्धाने कोल्हापूरकरांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी तिचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. आपल्या आवडत्या अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते. त्यांचं हे प्रेम पाहून श्रद्धा भावूक झाली. स्टेजवरून बोलताना तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी श्रद्धा म्हणाली, 'एवढं प्रेम.. मी तुम्हाला एक सांगू, मी तुम्हा सर्वांना बाहेरुन बघितलं. एवढं प्रेम मला तुम्ही दिलं. माझे डोळे भरून आलेत. खरंच माझं मन ना खूपच भरून आलंय'.

पुढे ती म्हणाली, 'खरंच तुमचं प्रेम पाहून माझं मन भरुन आलं आहे. आता मला खूप जास्त ओव्हरव्हॅल्मिंग वाटतं आहे. खूप-खूप-खूप जास्त ओव्हरव्हेल्मिंग वाटतंय. आणि मला नाही वाटत की मी इथून जाऊ आता. मला कोणीतरी रूम देणार का आता? खरंच, थँक्यू, थँक्यू सो मच!'

श्रद्धाच्या या बोलण्याने उपस्थित चाहत्यांमध्येही उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. कोल्हापूरकरांनी दिलेल्या प्रेमाने ती किती भारावून गेली आहे, हे तिच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होतं.

Shraddha Kapoor Kolhapur Video
Netflix Controversy: पाकिस्तानी सीरिज दाखवणं नेटफ्लिक्सला पडणार महागात! AICWAचा थेट इशारा; कार्यालयाला घेराव घालणार, कारण काय?

सोशल मीडियावरही श्रद्धाच्या मराठमोळ्या लूकची चर्चा

कोल्हापूरमधील या खास भेटीचे काही फोटो श्रद्धाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा पारंपरिक लूक पाहायला मिळत आहे. लाल नऊवारी साडी आणि पारंपरिक दागिन्यांमधील श्रद्धाचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

तिच्या या लूकवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी तिच्या सौंदर्याचं आणि मराठमोळ्या अंदाजाचं कौतुक केलं आहे. 'ईठा' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कोल्हापूरकरांकडून मिळालेलं प्रेम श्रद्धासाठी नक्कीच खास आहे.

डिसेंबर २०२६ मध्ये 'ईठा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत असून, श्रद्धाच्या कोल्हापूर दौऱ्याचीही सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.