

श्रद्धा कपूरचा बहुप्रतीक्षित चित्रपट ईठाचा ट्रेलर लवकरच जारी करण्यात येणार आहे. तसी घोषणा या चित्रपटाची मुखे अभिनेत्री श्रद्धा कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून केलीय. श्रद्धा 'ईठा' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर वापसी करतेय.
तिचा या चित्रपटातील लूक प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाची चर्चा खूप झाली होती. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर जून महिन्यात रिलीज झाली होता. त्यावेळी श्रद्धाच्या या भूमिकेविषयी प्रचंड चर्चा झाली होती. हा चित्रपट ऑगस्ट २०२६ मध्येच प्रदर्शित होणार होता. परंतु नंतर तो पुढे ढकलून ४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर प्रेक्षकांना या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा होती. आता चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे.
श्रद्धा कपूरने ट्रेलर प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केलीय. तिची आणखी एक झलक या ट्रेलरच्या पाहायला मिळणार आहे.
'ईठा'च्या ट्रेलर प्रदर्शनाची तारीख जाहीर
श्रद्धा कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी घोषणा केली की, 'ईठा'चा ट्रेलर शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित होईल. तिने टीझर शेअर करत म्हटलंय, बिखरेगा जलवा इस शुक्रवार #EETHA ट्रेलर या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये!"
रिपोर्टनुसार, या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाकडून 'UA 16+' प्रमाणपत्र मिळाले आहे. २ मिनिटे ५८ सेकंदांचा हा ट्रेलर आहे. तो 'रामायण' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी चित्रपटगृहांमध्ये दाखवला जाईल, असे म्हटले जात आहे.
'ईठा' हा चित्रपट लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित करत आहेत. महाराष्ट्रातील तमाशा आणि लावणी क्षेत्रातील कलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर ठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारत आहे. विठाबाई नारायणगावकर यांचा प्रसिद्धीपर्यंतचा प्रवास, वैयक्तिक आयुष्य आणि एक कलाकार म्हणून केल्चाय प्रती निष्ठा कशी जोपासली, त्यांचा कलात्मक वारसा मोठ्या पडद्यावर मांडला जाणार आहे.
चित्रपटात असतील हे कलाकार
श्रद्धा कपूरसोबतच या चित्रपटात रणदीप हुड्डा, सिद्धार्थ जाधव, मोहम्मद झीशान अय्युब, अनंत जोशी, अक्षरा सिंग, उल्का गुप्ता हे कलाकार पाहायला मिळणार आहेत.