लवंगी मिरची मालिकेचे स्क्रिनिंग धूमधडाक्यात !

लवंगी मिरची मालिका
लवंगी मिरची मालिका

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'लवंगी मिरची' या नव्या मालिकेचे स्पेशल स्क्रीनिंग सेटवर आयोजित केले होते. कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माता यासह संपूर्ण टीम या कार्यक्रमाचा भाग होती. "लवंगी मिरची"ही मालिका एका डॅशिंग मुलीची आहे जी अन्याया विरुद्ध आवाज उठवतेय, आपल्या आईला हक्क मिळवून देण्यासाठी लढतेय. या मालिकेची निर्मिती रुची फिल्म्स (संगीत कुलकर्णी) ने केलीय. संगीत कुलकर्णी यांच्या अस्मिता आणि शुभंकरोती या मालिका झी मराठीवर गाजल्या आहेत. या मालिकेतून लागीर झालं जीची अभिनेत्री शीतली म्हणजेच शिवानी बावकरसोबतच श्रुजा प्रभुदेसाई, समिधा गुरु, परी तेलंग, मिथिला पाटील आणि तन्मय जक्का महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news