Mahashivratri Murudeshwar : मुरुडेश्वरला कधी गेलाय का? नक्की प्लॅन करा | पुढारी

Mahashivratri Murudeshwar : मुरुडेश्वरला कधी गेलाय का? नक्की प्लॅन करा

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची शिवमूर्ती मुरुडेश्वर इथे आहे. कर्नाटक राज्यातील कंडुका डोंगरावर मुरुडेश्वर मंदिर आहे. (Mahashivratri Murudeshwar ) अरबी समुद्राने वेढलेला मुरुडेश्वर बीचदेखील आहे. भोलेनाथाची विशाल आणि भव्य मूर्ती पाहण्यासाठी तीर्थयात्रेकरू दूरवरून येत असतात. शिवची मूर्ती इतकी उंच आहे की, ती दूरवरूनही पाहता येईल. ही भगवान शिवची मूर्ती बनवण्यासाठी दोन वर्षाचा काळ लागला आहे. (Mahashivratri Murudeshwar )

मुरुडेश्वर मंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. मुरुडेश्वर मंदिराची उंची (Murudeshwar Temple Height) १२३ फूट आहे. भगवान शिवची विशाल मूर्तीचे एक मनमोहक दृश्य नजरेस भरते. मुरुडेश्वर मंदिराच्या मुख्य द्वाराला गोपुर म्हटले जाते.
मुरुडेश्वर येथे काय काय पहाल?

स्टॅच्यू पार्क मुरुडेश्वर –

मुरुडेश्वरच्या जवळपास अनेक ठिकाणी फिरeयला जाता येईल. स्टॅच्यू पार्क मुरुडेश्वरचं प्रमुख आकर्षण आहे. स्टेच्यू पार्कमध्ये भगवान शिवची १२३ फूट उंच मूर्ती आहे. हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनली आहे. या पार्कमध्ये हिरवीगार ढाचे, सुंदर फुले आणि उत्साहित वातावरणासाठी ओळखले जाते. मूर्ती पार्कमध्ये सुंदर तलावात फिरणारे बदक आणि धबधबा पाहण्याजोगे आहे.

मुरुडेश्वर किल्ला –

मुरुडेश्वर मंदिराच्या परिसरात मुरुडेश्वर किल्ला एक प्रमुख आकर्षण आहे. मुरुडेश्वर किल्ला प्रसिद्ध मुरुडेश्वर मंदिराच्या मागे आहे. मुरुडेश्वर किल्ल्यांचा इतिहास विजयनगर साम्राज्याच्या संबंधित आहे.

भटकल बीच मुरुडेश्वर –

मुरुडेश्वर मंदिरच्या जवळ फिरण्यसाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणजे भटकल बीच. हे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. भटकल बीच अरबी समुद्राच्या किनारी स्थित असून नारळाच्या झाडांनी येथे गर्दी केलेली दिसते. (Mahashivratri Murudeshwar )

नेत्रानी द्वीप मुरुडेश्वर –

मुरुडेश्वरचे पर्यटन करताना नेत्रानी द्वीपला नक्की भेट द्या. नेत्रानी द्वीपला ‘कबूतर द्वीप’ नावानही ओळखले जाते. उंचावरून हे द्वीप पाहिले असता ह ऋदयाच्या आकाराप्रमाणे दिसते. अरबी समुद्रात पर्यटकांना स्कूबा डायविंग, नौका विहार आणि मासेमारीचा आनंद घेता येतो.

मुरुडेश्वर बीच –

मुरुडेश्वर समुद्री किनारी पर्यटकांना आकर्षित करणारे आहे. मुरुडेश्वर मंदिराला भेट देणारे पर्यटक मुरुडेश्वर बीचला अवश्य भेट देतात. मुरुडेश्वर बीचवर तुम्ही वॉटर स्पोर्टदेखील करू शकता. पर्यटकांसाठी हे एक शानदार पिकनिक डेस्टिनेशन म्हणूनही ओळखले जाते. मुरुडेश्वर मंदिराच्या शेजारी नौकाविहार करण्याचा आनंदही तुम्ही लूटू शकता. इथे उंच उंच डोंगर, हिरवीगार झाडे, अडमारे सीगल पक्षी, गल, किंगफिशर पक्षी दृष्टीस पडतात.

काय खाल?

स्थानिक पदार्थांमध्ये डोसा, बिसी बेले बाथ, उप्पितु, वंगी बाथ, अक्की रोटी, जलादा रोटी, इडली-सांभर, केसरी बाथ, वडा, रग्गी मुडडे. यासिवाय मैसूर पाक, ओब्बट्टू, धारवाड पेढा इ.

काय खरेदी कराल?

मुरुडेश्वर मंदिर आणि पर्यटन स्थळी यात्रेदरम्यान स्मृति चिन्हे, मूर्ती, हस्तशिल्प वस्तू आणि पेन, ज्वेलरी बॉक्स, कपडे खरेदी करू शकता.

या महिन्यांमध्ये जाणे योग्य –

मुरुडेश्वरला ऑक्टोबर ते मे यादरम्यान जाणं योग्य ठरेल.

कसे जाल मुरुडेश्वरला?

मुरुडेश्वर फिरणयासाठी फ्लाईट, ट्रेन आणि बसचीदखील निवड करू शकता. तुम्ही कारने गेल्यास उततमच! फ्लाईटसाठी मंगलोर विमानळ आहे. तर रेल्वेसाठी मुरुडेश्वर जंक्शन प्रमुख रेल्वे स्टेशन आहे. मुरुडेश्वर रेल्वे स्टेशन मंदिरापासून जवळपास ३ किलोमीटर अंतरावर आहे.

(फोटो-नीता कुबडे, कोल्हापूर)

Back to top button