.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खानला डोळ्यांचा त्रास होऊ लागल्याने तो उपचारासाठी अमेरिकेला गेल्याचे वृत्त समोर आले होते. रिपोर्टनुसार, अमेरिकेत त्याने आपल्या डोळ्यांची सर्जरी केली. या सर्व वृत्तांदरम्यान, शाहरुख बुधवारी (३१ जुलै) रोजी मुंबईमध्ये आयोजित दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या बर्थडे पार्टीत पोहोचला. (Shahrukh Khan)
असं म्हटलं जातं की, पॅपराझींशी वाचवण्यासाठी किंग खानने मॅनेजर पूजा ददलानी सोबत गुपचुपपणे किचनमधून एंट्री घेतल्याचे समजते.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. शाहरुखने डोळ्यांच्या सर्जरी दरम्यान काळा गॉगलदेखील लावल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. रेस्टॉरंट बाहेर आधीपासून उपस्थित असलेल्या कॅमेरामन्सनी आपल्या कॅमेऱ्यात त्याला कैद केलं.
शाहरुखच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं असेल तर सुहाना खान सोबत चित्रपट 'किंग'चे शूटिंग करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजॉय घोष आहेत.
Video - Diksha Sharma x अकाऊंटवरुन साभार