.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : वेब सीरीज 'स्क्विड गेम २' ची रिलीज डेट समोर आली आहे. नेटफ्लिक्सची सुपरहिट ड्रामा सीरीज 'स्क्विड गेम'च्या पुढील सीजनची प्रत्येकाला प्रतीक्षा आहे. अखेर निर्मात्यांनी या सुपरहिट कोरियन वेब सीरीजचा दुसऱ्या सीजनची अधिकृत घोषणा केली आहे.
'स्क्विड गेम' १७ सप्टेंबर, २०२१ रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. आता तीन वर्षांनंतर दुसरा सीजन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तयार आहे.
'स्क्विड गेम'च्या दुसऱ्या सीझनचे प्रीमियर २६ डिसेंबर, २०२४ ला नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. OTT प्लॅटफॉर्मने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर पहिला व्हिडिओ शेअर केला आहे. निर्मात्यांनी 'स्क्विड गेम' च्या तिसऱ्या सीझनची अपडेट दिली आहे. 'स्क्विड गेम ३' हा चित्रपट २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. 'स्क्विड गेम २' मधील अभिनेता ली जंग जेची पहिली झलक देखील समोर आली आहे.