Suhana Khan : शाहरुखची मुलगी सुहाना खानसोबत ‘लाजाळू’ मिस्ट्री बॉय कोण ?
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ( Suhana Khan ) नेहमी तिच्या हॉट फोटोने चर्चेत असते. सुहाना सध्या एका मिस्ट्री बॉय' सोबत स्पॉट झाल्याने तिच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधान आलं आहे. सुहानासोबतचा हा 'मिस्ट्री बॉय' कोण आहे?, हा कोणता फ्रेंड आहे, जो आपला चेहरा लपवतो? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहे.
नुकतेच सुहाना खान ( Suhana Khan ) मित्रासोबत एका कारमध्ये स्पॉट झाली आहे. हा फोटो सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोत सुहानाने काळ्या रंगाच्या डेनिम जॅकेटमध्ये तर मिस्ट्री बॉयने पांढऱ्या रंगाचा टिशर्ट परिधान केल्याचे दिसत आहे. यातीस विशेष म्हणजे, मित्रासोबत सुहाना दिसताच कॅमेरामॅनने दोघांचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुहानासोबत तिच्या मित्राने चेहरा लपवला आहे. यावेळी मिस्ट्री बॉयने आपल्या हाताचा वापर करत चेहरा लपवला आहे. यावेळी सुहानाचा मात्र, छोडासा चेहरा दिसला आहे.
हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच नेटकऱ्यांनी प्रश्नाचा भडिमार केला आहे. यात एका नेटकऱ्याने 'सुहानासोबत असणारा मिस्ट्री बॉय कोण आहे?', 'तिचा आधीचा बॉयफ्रेंड आहे?' 'सुहानाचा कोणता मित्र चेहरा लपवत आहे?' असे अनेक प्रश्न विचारण्यास सुरूवात केली आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने 'किंग खानच्या मुलीसोबत हा कोण आहे. ज्याला आपला चेहरा लपवावा लागत आहे?' असे म्हटले आहे. सुहाना का कोण मित्र आहे हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक झाले आहेत.
सुहाना खान नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून आपले हॉट फोटोज शेअर करत असते. गेल्या काही दिवसांत सुहाना तिच्या अफेअरमुळे चर्चेत आली होती. यावेळी ती चंकी पांडेचा मुलगा अहान पांडेला डेटिंग करत असल्याचे वृत्त समोर आले होते. सुहानाचे इंस्टाग्रामवर २ लाखांहून अधिक फालोव्हर्स आहेत.
हेही वाचलंत का?
( photo : familee_khan and suhanakhan2 वरून साभार)

