अमेरिकेत स्वरा भास्करच्या रेशनवर कॅब ड्रायव्हरचा डल्ला

swara bhaskar
swara bhaskar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर चित्रपटांमध्ये अभिनय करण्यासोबतच आपले ठाम मत मांडण्यासाठी ओळखली जाते. अनेकदा स्वरा तिचे मत सोशल मीडियावर पोस्ट करते. अलीकडेच तिच्यासोबत एक विचित्र घटना घडलीय. त्याचा उल्लेख स्वतः अभिनेत्रीने सोशल मीडियावर केला आहे.

खरंतर, स्वरा सध्या लॉस एंजेलिसमध्ये आहे. ती रेशनच्या वस्तू खरेदी करण्यासाठी गेली. सर्व वस्तू खरेदी केली. पण, तिचा कॅब ड्रायव्हर सर्व सामान घेऊन निघून गेला. अभिनेत्रीने बुधवारी ट्विट करून या घटनेची माहिती दिली. त्यांनी उबर कॅबला ट्विट करून घटनेची माहिती दिली. तिने ट्विटरवर लिहिले, 'अहो @Uber_Support, लॉस एंजेलिसमधील तुमचा एका ड्रायव्हर मी प्री-एडेड स्टॉपवर असताना सर्व रेशनसह कार घेऊन गेला. तुमच्या अॅपवर याची तक्रार करण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही. तो हरवला असे नाही, तो सर्व वस्तू घेऊन निघून गेला. मला माझे सामान परत मिळेल का? यासोबतच तिने #touristproblems देखील लिहिले आहे.

स्वराच्या या ट्विटवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका युजरने लिहिले आहे – Uber, कृपया तुम्ही हिच्यावर विश्वास करू नका, ही फ्री सामग्रीसाठी असे काहीतरी करू शकते. दुसऱ्या यूजरने लिहिले – कृपया त्यांना उत्तर देण्याची तसदी घेऊ नका. प्रसिद्धीझोतात येण्यासाठी बिनबुडाचे आरोप करण्याची त्यांना सवय आहे.

तिसऱ्या युजरने म्हटले आहे की, हे सर्व कर्मांचे फळ आहे. अलीकडेच स्वरा काश्मीर फाईल्स या चित्रपटावर वक्तव्य करून चर्चेत आली होती. चित्रपटावर प्रतिक्रिया व्यक्त करताना स्वरा भास्करने ट्विट केले होते की, "कोणी तरी येऊन तुमच्या 'यशासाठी' तुमचं अभिनंदन करावं असं वाटत असेल तर आधीची पाच वर्षे तुम्ही त्यांच्या डोक्यावर घाण करता कामा नये." स्वराने हा टोला काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना लागवल्याची चर्चा सोशल मीडियावर होती.

वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर स्वरा भास्कर आता 'शीर कोरमा' या शॉर्ट फिल्ममध्ये दिसणार आहे. या चित्रपटात स्वरा भास्कर एका लेस्बियनच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दिव्या दत्ता आणि शबाना आझमी दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फराज आरिफ अन्सारी यांनी केले आहे. एका प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट आहे. अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये या शॉर्टफिल्मचे स्क्रीनिंगही झाले आहे. तिने 'जहां चार यार' चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news