

TV actress Sanchita Ugale’s death Her Dilwali Dulha Le Jayegi co-star Sorab Bedi revealed her final days
टीव्ही अभिनेत्री संचिता उगले हिच्या आकस्मिक निधनामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. हुसरीकडे, 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' (Dilwale Dulhania Le Jayenge) मधील तिचे सह-कलाकार सोराब बेदी यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.
तिचे मित्र आणि सहकारी कलाकार यांनी दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पॅपराझींशी बोलताना ते म्हणाले की, संचिताच्या निधनापूर्वी अवघ्या दोन दिवस आधीच त्याचे तिच्याशी बोलणे झाले होते. त्या काळात ती खूप अस्वस्थ वाटत होती.
त्यांनी सांगितले की, "मला आज सकाळीच या घटनेबद्दल समजले. ती नक्कीच तणावाखाली किंवा अस्वस्थ असावी. मी दोन दिवसांपूर्वीच तिच्याशी बोललो होतो. मी तिच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांचीही भेट घेईन."
याआधी, सोराबने सोशल मीडियावर संचिताला श्रद्धांजली वाहिली. 'दंगल टीव्ही'वरील 'दिलवाली दुल्हनिया ले जाएंगे' या मालिकेत दोघांनी एकेत्र काम केले होते. सोराबने दोघांचे एकत्र असलेले पोस्टर आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले. त्याने लिहिले, "नाही छोटू... तू माझी आवडती होतीस, आहेस आणि नेहमीच राहशील; तुझी खूप आठवण येईल." त्याने संचितासोबतचा फोटो शेअर कjl एक भावूक संदेश लिहिला, "मिलने वाले थे हम यार."
संचिताच्या अकाली निधनामुळे तिचे चाहते आणि मनोरंजन क्षेत्रातील सहकाऱ्यांमध्ये शोक व्यक्त केला जात असून, या तरुण अभिनेत्रीच्या जाण्याने सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १४ जून रोजी नालासोपारा (पूर्व) येथील आचोळे गावातील एका इमारतीत संचिताने आपल्या राहत्या घरी आपले जीवन संपवले होते.