Pravin Tarde post on Deool band 2 | 'मायबाप रसिक प्रेक्षकांमुळेच!' प्रवीण तरडेंची इन्स्टा पोस्ट चर्चेत; ‘देऊळ बंद २’ने २६ दिवसांत गाठला इतक्या कोटींचा टप्पा

Pravin Tarde post on Deool band 2 | मायबाप रसिक प्रेक्षकांमुळेच..! प्रवीण तरडेंची इन्स्टा पोस्ट चर्चेत; २६ दिवसांत तब्बल इतक्या कोटींचा जमवला गल्ला
Pravin Tarde
actor Pravin Tarde post on Deool band 2 pudhari photo
Published on
Updated on
Summary

‘देऊळ बंद २’च्या यशानंतर प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर प्रेक्षकांचे आभार मानणारी पोस्ट शेअर केली आहे. “मायबाप रसिक प्रेक्षकांमुळेच हे यश शक्य झाले,” असे म्हणत त्यांनी चित्रपटाला मिळालेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान, चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या २६ दिवसांत कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याने मराठी चित्रपटसृष्टीत त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

Pravin Tarde post on Deool band 2 movie box office collection day 29th

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे सध्या त्यांच्या देऊळबंद २ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि बॉक्स ऑफिसवरील यश पाहता प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

प्रवीण तरडे यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?

प्रवीण तरडे यांनी इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले आहेत. “मायबाप रसिक प्रेक्षकांमुळेच हे यश शक्य झाले,” असे म्हणत त्यांनी चित्रपटाला मिळालेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मराठी चित्रपटांवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांमुळेच हा प्रवास यशस्वी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. कथानक, कलाकारांचा अभिनय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणारी मांडणी यामुळे चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील प्रेक्षकांनीही चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे तरडे स्वत: चित्रपटगृहात प्रेक्षकांशी संवाद साधून प्रतिक्रिया जाणून घेत आहेत.

चित्रपटाची आतापर्यंतची कमाई किती?

चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या २६ दिवसांत कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याचे समोर आले आहे. 'देऊळ बंद २' (Deool Band 2) ने चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या २६ दिवसांत बॉक्स ऑफिसवर ८६ कोटी रुपयांहून अधिकची कमाई केली आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या भक्तीपर चित्रपटाची निर्मिती साधारण १० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये करण्यात आली होती. हा चित्रपट एक प्रचंड 'सरप्राईज हिट' ठरला आणि इतिहासातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला.

Pravin Tarde
Comedian Madhur Virli Apologizes | बलात्कारावरून विनोद करणाऱ्या कॉमेडियन मधुर विरलीचा अखेर माफीनामा; 'खरोखरच दिलगिरी व्यक्त करतो'

बजेट: ८ ते १० कोटी रुपये

एकूण कमाई: अंदाजे ८४ ते ८६ कोटी रुपये

सुमारे ६५ कोटी रुपये (नेट कलेक्शन)

पहिल्या दिवसाची कमाई: २.९१ कोटी रुपये

पहिल्या आठवड्याची कमाई: ३०.२० कोटी रुपये

या चित्रपटाने जो नफा मिळवला आहे, तो या वर्षातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या प्रादेशिक चित्रपटांपैकी एक ठरल्याचे म्हटले जात आहे.

सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या 'राजा शिवाजी' आणि 'सैराट' सारख्या यशस्वी चित्रपटांच्या बरोबरीने या चित्रपटानेही आपले स्थान पक्के केले आहे. 'देऊळ बंद २' च्या बॉक्स ऑफिसचा लवकरच १०० कोटी रुपयांचा टप्पा गाठू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Pravin Tarde
Tv actress Sanchita Ugale Death|कुमकुम भाग्य फेम अभिनेत्री संचिता उगलेने संपवले जीवन, शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news