Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादानंतर समय रैना आणि रणवीर अलाहबादिया पुन्हा एकत्र; कपिल शर्माच्या शोमध्ये झळकणार

Samay Raina Ranveer Allahbadia Controversy: समय रैना आणि रणवीर अलाहबादिया ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादानंतर पुन्हा एकत्र दिसणार आहेत. दोघे कपिल शर्माच्या विशेष भागात सहभागी होणार आहेत.
Samay Raina Ranveer Allahbadia
Samay Raina Ranveer Allahbadia Pudhari
Published on
Updated on

Samay Raina Ranveer Allahbadia Controversy: वादग्रस्त ठरलेल्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ प्रकरणानंतर समय रैना आणि रणवीर अल्लाबदिया पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. दोघेही आता 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या विशेष भागात सहभागी होणार आहेत.

वर्ल्ड लाफ्टर डेच्या निमित्ताने हा खास एपिसोड 2 मे रोजी Netflix वर प्रदर्शित होणार आहे. या भागात कपिल शर्मा सोबत अनेक लोकप्रिय डिजिटल क्रिएटर्स आणि कॉमेडियन दिसणार असल्याची चर्चा आहे.

टीझरने उत्सुकता वाढवली

या विशेष भागाचा टीझरही समोर आला आहे. त्यात समय रैना म्हणताना दिसतो की, तो अखेर त्याच्या आवडत्या शोमध्ये येत आहे, पण त्याच्यासोबत गेस्ट कोण आहे हे सांगितलेलं नाही.

यानंतर अचानक रणवीर अलाहबादिया एंट्री करतो. त्याला पाहताच समय रैना आश्चर्यचकित होत “नो वे, ब्रो!” असं म्हणताना दिसतो. यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Samay Raina Ranveer Allahbadia
Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवणार; रिलीजपूर्वीच केला मोठा विक्रम, महाराष्ट्रात क्रेझ

‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादामुळे दोघे चर्चेत

गेल्या वर्षी India's Got Latent या शोमध्ये रणवीर अलाहबादिया सहभागी झाला होता. त्यावेळी शोदरम्यान त्याने केलेल्या एका अश्लील आणि वादग्रस्त विनोदामुळे मोठा गदारोळ झाला होता.

त्या क्लिपचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणामुळे समय रैनाला त्याच्या यूट्यूब चॅनलवरील शोचे सर्व एपिसोड हटवावे लागले होते.

अनेक राज्यांत गुन्हे दाखल

या वादानंतर समय रैना, रणवीर अल्लाबदिया, आशिष चंचलानी, अपूर्व मुखिजा आणि जसप्रीत सिंग यांच्याविरोधात महाराष्ट्र, आसाम आणि राजस्थानमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Samay Raina Ranveer Allahbadia
OPEC Impact: तेल संकटाची भीती! UAEने ओपेकमधून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला? भारतावर काय होणार परिणाम?

सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानेही कठोर भूमिका घेतली होती. न्यायालयाने रणवीर अलाहबादिया यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत अशा प्रकारची भाषा लज्जास्पद असल्याचं म्हटलं होतं.

तसेच सार्वजनिक माफी मागण्याचे निर्देशही देण्यात आले होते. दरम्यान, आता या सर्व वादानंतर समय रैना आणि रणवीर अलाहबादिया पुन्हा एकत्र स्क्रीनवर दिसणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news