

सामंथा रुथ प्रभूचा एक नवीन फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हाईट फिटेड टॉपमधील या लूकमुळे काही नेटकऱ्यांनी तिच्या बेबी बंपबाबत अंदाज व्यक्त केले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र या बातमीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
samantha ruth prabhu pregnancy rumours
दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत विविध तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
व्हायरल फोटोमध्ये सामंथा व्हाईट रंगाच्या फिटेड टॉपमध्ये दिसत असून तिच्या लूकवरून काही सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपची चर्चा सुरू केली आहे. या फोटोमुळे तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांना उधाण आले. अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली.
मीडिया रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी ‘मा इंटी बंगारम’च्या सक्सेस पार्टीमध्ये समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये सामंथाचा बदललेला लूक समोर आला होता. यावेळी तिने बॉडी फिट व्हाईट टॉप परिधान केली होता, ज्यामुळे तिचे बेबी बंप फ्लॉन्ट झाले. मात्र, अभिनेत्री सामंथा किंवा तिचे पती राज निदिमोरू यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
दरम्यान, एका मुलाखतीदरम्यान दिग्दर्शिका नंदिनी रेड्डी यांनी सामंथाबद्दल बोलताना म्हटले होते की, हा तिच्या जीवनातील अत्यंत सुंदर काळ आहे. त्यानंतर चाहत्यांनी तर्क-वितर्क लावायला सुरुवात केली. परंतु, सर्व चर्चांवर सामंथा रुथ प्रभूने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तिने सोशल मीडियावरही याबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही.
सामंथा आणि दिग्दर्शक राज निदिमोरू यांनी डिसेंबर २०२५ मध्ये लग्न केले होते. कोईमत्तूर येथील सद्गुरूंच्या ईशा योग केंद्रातील लिंग भैरवी मंदिरात हा विवाहसोहळा पार पडला.
सामंथा रुथ प्रभूच्या नव्या चित्रपटाचे यश
सामंथा रुथ प्रभूची निर्मिती असलेला 'मा इंटि बंगारम' चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. फॅमिली ॲक्शन कॉमेडी ड्रामा या चित्रपटाने ३ दिवसांत ४३ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. नंदिनी रेड्डी यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि राज निदिमोरू यांनी तयार केलेल्या या चित्रपटात दिगंत आणि गुलशन देवैया यांच्या मुख्य भूमिका आहेत. तसेच श्रीमुखी, गौतमी, आनंद, लक्ष्मी, श्रीनिवास गविरेड्डी आणि मंजुषा या कलाकारांचाही समावेश आहे. सामंथाच्या स्वतःच्या 'ट्रलाला मुव्हिंग पिक्चर्स' या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती झाली आहे.