Deoolband-2 Box Office | ३२ दिवसांत कमाईची दे दणादण! अवघड होतं सगळं पण स्वामींच्या अन् तुमच्या जीवावर शक्य झालं.. प्रवीण तरडेंची भावनिक पोस्ट

Deoolband-2 Box Office | ३२ दिवसांत कमाईची दे दणादण! अवघड होतं सगळं पण स्वामींच्या अन् तुमच्या जीवावर शक्य झालं.. प्रवीण तरडेंची भावनिक पोस्ट
Deoolband-2 Box Office
Deoolband-2 Box Office collectionpudhari photo
Published on
Updated on
Summary

'देऊळबंद-2'च्या यशानंतर प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत मराठी चित्रपटसृष्टीच्या यशस्वी वाटचालीचा गौरव केला आहे. नागराज मंजुळे यांच्या 'सैराट'पासून रितेश देशमुख यांच्या 'राजा शिवाजी'पर्यंतचा प्रवास सांगत त्यांनी 'देऊळबंद-2'ही शंभरीच्या उंबरठ्यावर असल्याचे संकेत दिले. तसेच मराठी सिनेमाचे तिसरे शतक साजरे करण्याचे स्वप्नही त्यांनी व्यक्त केले.

Pravin Tarde on deeolband 2 box office collection emotional post

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या 'देऊळबंद-२'ची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळवणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केलीय. विशेष म्हणजे प्रदर्शनाच्या तब्बल ३२ दिवसांनंतरही चित्रपटाची घोडदौड कायम असून कमाईचा वेगही कायम राखण्यात तो यशस्वी ठरला आहे. चित्रपटाच्या या यशानंतर अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे. चित्रपटाला मिळालेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी प्रेक्षकांसह स्वामींचे आभार मानले.

प्रवीण तरडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'मित्रांनो नागराजच्या सैराटने खणलेल्या रस्त्यावरून रितेश राजा शिवाजी घेउन डौलात निघाला त्याच्या मागोमाग आपला देऊळबंद-२ घेऊन मी १०० च्या शेवटच्या टप्प्यावर आलोय.. खूप अवघड होतं सगळं पण स्वामींच्या आणि तुमच्या जीवावर शक्य झालं .. मराठी सिनेमा मोठा होतोय..लवकरच मराठी सिनेमाचं तिसरे शतक साजरं करू.'

Deoolband-2 Box Office
Eetha clash Toxic box office | यशच्या 'टॉक्सिक'ची रिलीज डेट निश्चित; श्रद्धा कपूरच्या 'ईठा'सोबत होणार 2026 मधील सर्वात मोठी बॉक्स ऑफिस लढत

"अवघड होतं सगळं पण स्वामींच्या अन् तुमच्या जीवावर शक्य झालं." या एका वाक्यातून त्यांनी चित्रपट निर्मितीदरम्यान आलेल्या अडचणी, संघर्ष आणि त्यावर मात करत मिळवलेल्या यशाचा प्रवास मांडला आहे.

या पोस्टमधून तरडे यांनी मराठी चित्रपटांच्या यशामागे प्रेक्षकांचे योगदान किती महत्त्वाचे आहे, यावर भर दिला. 'सैराट'ने मराठी सिनेमासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे दरवाजे उघडले. त्यानंतर अनेक मोठ्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर उल्लेखनीय यश मिळवले. आता 'देऊळबंद-2'लाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. हा चित्रपट लवकरच शंभरीच्या आकड्याजवळ पोहोचल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

देऊळबंद २ बॉक्स ऑफिस कलेक्शन

एकूण दिवस - ३२

बॉक्स ऑफिस-८८.२० कोटी

इतर देश- ४.२० कोटी

तंबू शो १.१० कोटी

एकूण ९३.५० कोटी रुपये

Deoolband-2 Box Office
Deool Band 2 Box Office Collections Week 4 |'देऊळबंद-२'ची बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई; ९० कोटींच्या दिशेने घोडदौड, प्रवीण तरडेंची खास पोस्ट व्हायरल

'देऊळबंद-2'च्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. ग्रामीण पार्श्वभूमी, अध्यात्मिक भावविश्व आणि सामाजिक संदेश यांचा उत्तम मेळ या चित्रपटात पाहायला मिळतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news