Salman Khan: मोठी बातमी! सलमान खानच्या नवीन चित्रपटाचे दिग्दर्शन करणार वामशी पैडिपल्ली; भाईजानचा साऊथमध्ये डंका!

Published on
Updated on
Summary

बॉलीवूडचा 'सुलतान' सलमान खान आता साऊथच्या दिग्गज टीमसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध तेलुगू निर्माता दिल राजू (Sri Venkateswara Creations) आणि 'महर्षी' फेम दिग्दर्शक वामशी पैडिपल्ली यांच्या आगामी चित्रपटात सलमान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या बॅक-टू-बॅक मोठ्या चित्रपटांच्या घोषणा करत आहे. 'मातृभूमी'नंतर आता त्याच्या नव्या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. दक्षिणेतील दोन बड्या नावांसोबत त्याचे नाव जोडले जात आहे.

Salman Khan: मोठी बातमी! सलमान खानच्या नवीन चित्रपटाचे दिग्दर्शन करणार वामशी पैडिपल्ली; भाईजानचा साऊथमध्ये डंका!
Vijay Varma Matka King Teaser : नागराज मंजुळेंचा 'मटका किंग' येतोय! विजय वर्माच्या वाढदिवशी टीझर रिलीज; पाहा कधी होणार प्रदर्शित?

अद्याप शीर्षक निश्चित नसलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण एप्रिलमध्ये सुरू होईल, अशी घोषणा 'श्री व्यंकटेश्वरा क्रिएशन्स' या निर्मिती संस्थेने केली आहे. एप्रिल २०२६ मध्ये या चित्रपटाचे शूटिंग होणार आहे.

Dil, Dimag, Jigar से... - सलमानची खास पोस्ट

सोमवारी सकाळी सलमानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून दिग्दर्शक वामशी पैडिपल्ली यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोसोबत त्याने लिहिले की, "Dil, Dimag, Jigar से from this April with Vamshi Paidipally and Dil Raju." श्री वेंकटेश्वर क्रिएशन्सच्या बॅनरखाली हा चित्रपट 'SVC63' (ताप्पुरते नावे) या नावाने तयार केला जात आहे.

कोण आहेत वामशी पैडिपल्ली आणि दिल राजू?

सलमानने दक्षिणेतील दोन मोठ्या नावांसोबत हातमिळवणी केली आहे ते म्हणजे दिल राजू आणि वामशी पैडिपल्ली. वामशी पैडिपल्ली हे दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी महेश बाबूचा 'महर्षी' चित्रपट आणला. ज्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता आणि थलपथी विजयचा 'वारिसू' यांसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. दुसरीकडे, दिल राजू हे तेलुगू सिनेसृष्टीतील यशस्वी निर्माते आहेत.

Salman Khan: मोठी बातमी! सलमान खानच्या नवीन चित्रपटाचे दिग्दर्शन करणार वामशी पैडिपल्ली; भाईजानचा साऊथमध्ये डंका!
Rajat Dalal wedding |रजत दलालच्या लग्नामुळे प्रिन्स नरुलाचा राग शांत! शत्रुत्व विसरून शेअर केला खास व्हिडिओ; म्हणाला, "आता वहिनीच तुला..."

सध्या सलमान खान 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' (Maatrubhumi) या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. हा चित्रपट ऑगस्ट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. आता नव्या चित्रपटासाठी सलमानच्या फॅन्सना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ईदला रिलीज होणार नवा चित्रपटासाठी?

मीडिया रिपोर्टनुसार, हा एक हाय-व्होल्टेज ॲक्शन ड्रामा असणार आहे. या चित्रपटात बॉलीवूडसोबतच साऊथचेही काही कलाकार दिसतील. निर्माते हा चित्रपट 'ईद २०२७' ला रिलीज करण्याचे नियोजन करत असल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news