Salman Khan Video: मध्यरात्री सलमान खान संतापला; हिंदुजा रुग्णालयाबाहेर पापाराझींना सुनावलं, रात्री 3 वाजता सलग 4 पोस्ट

Salman Khan Angry On Paparazzi: सलमान खान हिंदुजा रुग्णालयाबाहेर पापाराझींवर संतापल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Salman Khan Video
Salman Khan VideoPudhari
Published on
Updated on

Salman Khan Angry On Paparazzi: बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण आहे त्याचा संताप. मंगळवारी रात्री सलमान खान मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाबाहेर दिसला. मात्र, यावेळी चाहत्यांपेक्षा पापाराझींवरच त्याचा राग अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नाही तर मध्यरात्रीनंतर जवळपास 3 वाजता सलमानने सोशल मीडियावर सलग चार पोस्ट करत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.

हिंदुजा रुग्णालयाबाहेर नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान हिंदुजा रुग्णालयात कोणाला भेटण्यासाठी गेला होता. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, रुग्णालयाबाहेर उपस्थित असलेल्या पापाराझींनी सलमानला पाहताच फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी गर्दी केली. “भाई-भाई”, “सलमान खान” अशा आरोळ्या देत त्याचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे पाहून सलमान संतापल्याचं व्हिडिओमध्ये दिसून आलं.

सलमानने संतप्त होत, “तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती रुग्णालयात दाखल असेल तर तुम्ही अशी प्रतिक्रिया द्याल का?” असा सवाल केला आहे.

Salman Khan Video
4 Day Work Week: आठवड्यात फक्त 4 दिवस ऑफिस? कर्मचाऱ्यांना सलग 3 दिवस सुट्टी मिळणार; फक्त ही अट पाळावी लागणार

रात्री 3 वाजता सलग 4 पोस्ट

या घटनेनंतर सलमान खानने रात्री उशिरा इंस्टाग्रामवर सेल्फी पोस्ट करत सलग चार पोस्ट शेअर केल्या. त्यात त्याने पापाराझी कल्चरवर नाराजी व्यक्त केली.

पहिल्या पोस्टमध्ये त्याने माध्यमांनी संवेदनशीलता दाखवावी, अशी भूमिका मांडली. तर पुढील पोस्टमध्ये “चित्रपट महत्त्वाचा की एखाद्याचं आयुष्य?” असा सवाल करत अप्रत्यक्षपणे पापाराझींवर टीका केली.

एका पोस्टमध्ये त्याने “मी 60 वर्षांचा झालो, पण लढायला विसरलो नाही,” असं लिहित संताप व्यक्त केला. या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

चाहत्यांमध्ये चर्चा, सोशल मीडियावर वाद

सलमान खानच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही जणांनी सलमानच्या भूमिकेला समर्थन दिलं असून, रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी पापाराझींनी संयम ठेवावा, असं मत व्यक्त केलं आहे. तर काहींनी सलमानच्या भाषेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Salman Khan Video
Bank Jobs 2026: फ्रेशर्ससाठी बँकेत 12 हजारांहून अधिक नोकऱ्या; SBI-BOB मध्ये भरती, किती मिळणार पगार? काय असणार काम?

वर्कफ्रंटवर काय सुरू?

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, सलमान खान सध्या 'मातृभूमी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये त्याच्यासोबत चित्रांगदा सिंग दिसणार आहे. याशिवाय तो दिग्दर्शक वामशी पेडिपल्ली यांच्या आगामी चित्रपटातही काम करत असून, त्यात नयनतारा प्रमुख भूमिकेत असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news