

बॉलिवूड अभिनेता सलमान खान अलीकडेच एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्यानंतर त्याच्या प्रकृतीबाबत चर्चा रंगू लागल्या होत्या. क्लीन-शेव लूकमध्ये दिसलेल्या सलमानला पाहून अनेकांनी तो पूर्वीपेक्षा थकलेला आणि अशक्त वाटत असल्याचे म्हटले. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या तब्येतीबाबत विविध तर्क-वितर्क सुरू झाले.
व्हिडिओ- Yo Yo Funny Singh @moronhumor x अकाटंवरून साभार
व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये सलमान काहीसा दमलेला दिसत असल्याने चाहत्यांनी त्याच्या आरोग्याची चिंता व्यक्त केली होती. आता या चर्चांवर स्वतः अभिनेत्याने अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया दिली आहे.
काऊबॉय हॅटमधील स्टायलिश फोटो शेअर
सलमान खानने मध्यरात्री आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाच ब्लॅक अँड व्हाईट फोटो पोस्ट केली. या फोटोंमध्ये तो वेगवेगळ्या स्टायलिश लूकमध्ये दिसत असून, एका फोटोमध्ये त्याने काऊबॉय हॅट परिधान केली आहे. वयाच्या ६०व्या वर्षीही त्याचा हा हटके अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
या फोटोंसोबत सलमानने, "तुमची तब्येत कशी आहे?" अशी कॅप्शन लिहिली. या एका कॅप्शनमधून त्याने स्वतःच्या प्रकृतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना मिश्किल पद्धतीने उत्तर दिले. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
याआधी सलमान खान एका रुग्णालयाबाहेर दिसल्यानंतरही त्याच्या तब्येतीबाबत अफवा पसरल्या होत्या. त्यावेळी रुग्णालयाबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर त्याने नाराजी व्यक्त केली होती.
सलमान खानचे आगामी चित्रपट
सलमान खान सध्या दोन महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये बिझी आहे. एख आहे त्याचा 'मातृभूमी' हा चित्रपट आणि दुसरा दिग्दर्शक वामशी पेडीपल्ली यांच्या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटाचेही तो शूटिंग करण्यात बिझी आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत साऊथ अभिनेत्री नयनतारा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.