रामदेव बाबा म्हणाले.. "याची नजर नेहमी पतंजलीचा उत्तराधिकारी होण्यावरच असते." यावर कुमार विश्वासांनी दिले उत्तर..

कुमार विश्वास आणि बाबा रामदेव यांच्या रंगलेल्या गप्पा; 'पतंजली'च्या वारसदारावरून रंगली मिश्कील टोलेबाजी
baba ramdev said that kumar vishwas want to be patanjali successor
रामदेव बाबा म्हणाले.. "याची नजर नेहमी पतंजलीचा उत्तराधिकारी होण्यावरच असते." यावर कुमार विश्वासांनी दिले उत्तर.. file photo
Published on
Updated on

baba ramdev said that kumar vishwas want to be patanjali successor at ramayana pre trailer

गाझियाबाद : पुढारी ऑनलाईन देशातील प्रसिद्ध कवी कुमार विश्वास आणि योगगुरू बाबा रामदेव नुकतेच नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे रणबीर कपूरच्या 'रामायणम' चित्रपटाच्या प्री-ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मंचावर दोघांमध्ये झालेल्या हलक्याफुलक्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

baba ramdev said that kumar vishwas want to be patanjali successor
Ratnagiri news | विकासाची नवी ओळख मंडणगडची असेल; राज्यमंत्री योगेश कदम

व्हिडिओमध्ये बाबा रामदेव मिश्कीलपणे कुमार विश्वास यांना म्हणतात, "याची नजर नेहमी पतंजलीचा वारसदार होण्यावरच असते." हे ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो.

त्यावर कुमार विश्वासही तितक्याच विनोदी अंदाजात उत्तर देतात, "मी एकदा महाराजांना म्हणालो होतो, मला दत्तक घ्या. त्यावर त्यांनी सांगितले, 'जर तुला दत्तक घेतलं तर रोज सकाळी चार वाजता उठावं लागेल.' मग मी म्हणालो, 'ज्याचा बाप दोन लाख कोटींचा असेल, त्याने रात्री झोपायचंच कशाला?'" कुमार विश्वास यांच्या या उत्तरानंतर संपूर्ण सभागृहात जोरदार हास्याची लाट उसळली.

मंचावर बाबा रामदेव यांनी करून दाखवला 'उड्डियान बंध' योग

यानंतर बाबा रामदेव यांनी सांगितले की, पतंजलीचा वारसदार व्हायचे असेल तर कुमार विश्वास यांनी त्यांच्यासारखा योगही करावा लागेल. त्यानंतर त्यांनी सर्वांसमोर 'उड्डियान बंध' योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. या योगप्रकारात श्वास पूर्णपणे सोडल्यानंतर पोट आत ओढले जाते. त्यांचे हे प्रात्यक्षिक पाहून सभागृहातील उपस्थित पाहुणे आश्चर्यचकित झाले.

baba ramdev said that kumar vishwas want to be patanjali successor
MP Supriya Sule Nashik | 'आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय'

कार्यक्रमात रणबीर कपूरसह संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित

'रामायणम'च्या प्री-ट्रेलर कार्यक्रमाला अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री साई पल्लवी, अभिनेता यश, दिग्दर्शक नितेश तिवारी, अभिनेते अरुण गोविल आणि चित्रपट निर्माते नमित मल्होत्रा यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

2006 मध्ये झाली पतंजलीची स्थापना

बाबा रामदेव यांनी 2006 मध्ये आचार्य बालकृष्ण यांच्या सहकार्याने पतंजली आयुर्वेदची स्थापना केली. 30 हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल असलेला हा समूह आयुर्वेदिक उत्पादने, खाद्यपदार्थ आणि सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीसाठी ओळखला जातो. पतंजलीचे दैनंदिन व्यवस्थापन प्रामुख्याने आचार्य बालकृष्ण सांभाळतात. ते कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असून कंपनीतील 94 ते 98 टक्के हिस्सा त्यांच्या मालकीचा आहे. तर स्वामी रामदेव कंपनीचे प्रतिनिधित्व करत धोरणात्मक निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news