Rohit Saraf-Pratibha Ranta Dating? |'द रिवोल्युशनरीज' फेम प्रतिभा रांटा-रोहित सराफने आपलं नातं लपवलंय? डेटिंगच्या चर्चांना उधाण

Rohit Saraf-Pratibha Ranta Dating ? | चॉकलेट बॉय अडकलाय प्रेमात? प्रतिभा रांटा-रोहित सराफचं 'द रिवोल्युशनरीज'च्या सेटवर फुललं प्रेम?
Rohit Saraf-Pratibha Ranta
Rohit Saraf-Pratibha Ranta are Dating said report instagram
Published on
Updated on
Summary

बॉलिवूडचा 'नॅशनल क्रश' रोहित सराफ आणि 'लापता लेडीज'मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रतिभा रांटा सध्या त्यांच्या कथित रिलेशनशिनमुळे चर्चेत आहेत. निखिल अडवाणींच्या 'द रिवोल्युशनरीज' या वेब सीरिजमध्ये हे दोन्ही कलाकार एकत्र काम करत असून, सेटवर त्यांच्यात जवळीकता वाढली का? अनेकदा एकत्र स्पॉट झाल्यामुळे फॅन्सनी त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरु केल्या. अद्याप दोघांनीही अधिकृतपणे प्रेमाची कबुली दिली नसली, तरी सोशल मीडियावरील त्यांच्या 'क्युट' केमिस्ट्रीमुळे ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Rohit Saraf-Pratibha Ranta are dating?

बॉलिवूडमध्ये सध्या एका नव्या जोडीची जोरदार चर्चा रंगली आहे. 'मिसमॅच्ड' फेम चॉकलेट बॉय रोहित सराफ आणि 'लापता लेडीज' फेम प्रतिभावान अभिनेत्री प्रतिभा रांटा एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.

भुवन बाम, रोहित सराफ, प्रतिभा रांटा आणि गुरफतेह पीरजादा यांची प्रमुख भूमिका असलेला 'The Revolutionaries' सध्या चर्चेत आहे. या हिंदी वेब सिरीजचे दिग्दर्शन निखिल अडवाणी यांनी केले असून नुकताच या सीरीजचा टीझर रिलीज झाला आहे. आता प्रतिभा रांटा आणि रोहित सराफ हे दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण आहे-डेटिंग. खरंतर दोघांनीही आपल्या नात्याबद्दल उघडपणे सांगितले नसले तरी त्यांच्या फॅन्सनी तर्क-वितर्क लावायला सुरुवात केलीय.

Rohit Saraf-Pratibha Ranta
Dhurandhar 2 Box Office Collection Day 5: तुफान कमाई अन्‌ रेकॉर्ड मोडत चाललाय धुरंधर द रिवेंज, ग्लोबली कलेक्शन किती?

सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित सराफ (Rohit Saraf) आणि प्रतिभा रांटा (Pratibha Ranta) हे दोघे अनेकदा स्पॉट झाले आहेत. प्रतिभा आणि रोहित सध्या टाईम स्पेंट करत आहेत. ते चांगले मित्र असून गेल्या काही काळापासून दोघांच्या नात्याबद्दल तर्कवितर्क सुरु आहेत. एका पार्टीमध्ये निखिल अडवाणी यांच्यासोबत रोहित आणि प्रतिभा डान्स करतानाचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. ट्विटरवरील ट्विट्सपासून 'रेडिट'वरील दोघांच्या चर्चा होताना दिसल्या आहेत. पण त्यांनी आपल्या नात्याबद्दल कोणीही अद्याप उघडपणे सांगितलेले नाही.

कुठून सुरू झाली ही चर्चा?

या चर्चेची खरी सुरुवात झाली ती निखिल अडवाणींच्या आगामी 'द रिवोल्युशनरीज' (The Revolutionaries) या बिग बजेट वेब सीरिजच्या शूटिंगपासून. या सीरिजमध्ये रोहित आणि प्रतिभा मुख्य भूमिकेत आहेत. शूटिंगच्या दरम्यानचे त्यांचे काही पडद्यामागचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामध्ये त्यांची मैत्री आणि एकमेकांसोबतची ट्यूनिंग स्पष्टपणे दिसून येत होती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सीरिजच्या टीझरमध्येही दोघांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.

Rohit Saraf-Pratibha Ranta
Sarkar 4 | राम गोपाल वर्माचे 'सरकार ४' बद्दल मोठी अपडेट, ऐश्वर्या राय बच्चनबद्दल म्हणाला, 'ती आता..'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news