

Dhurandhar 2 Box Office Collection
धुरंधर २ जेव्हापासून रिलीज झालाय, तेव्हापासून चित्रपटाची तुफान कमाई सुरू आहे. अनेक रेकॉर्ड मोडत चाललेला रणवीर सिंहच्या या चित्रपटाने सोमवारी देखील शानदार कमाई केली. आदित्य धर दिग्दर्शित रणवीर सिंहच्या मुख्य भूमिकेतील धुरंधर २ ने कमाईबाबतीत अव्वल ठरला आहे. ईदचा सण, विकेंडचा भरपूर फायदा चित्रपटाला झालच शिवाय, नव्या आठवड्याची सुरुवात सोमवारी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली.
रिपोर्टनुसार, रणवीर सिंहच्या 'धुरंधर: द रिवेंज'ने सोमवार २३ मार्च रोजी जवळपास ६५ कोटींची (भारतात) कमाई केली. हा आकडा आता वाढलेला आहे. भारतात एकूण कलेक्शन ५१९.१२ कोटी रुपये आहे. ग्रॉस कलेक्शन ६१९.७६ कोटी झाले आहे. चित्रपटाचे वर्ल्डवाईड कलेक्शन आता २२ मार्चला ७६१ रुपये होते. आता ग्लोबली ८०० कोटींचे कलेक्शन झाले आहे.
‘धुरंधर: द रिव्हेंज’ चौथ्या दिवसाचे कलेक्शन
'धुरंधर' हा पाच भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये दाखल झाला आहे. (हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड) हिंदी पटट्यातील एकूण कलेक्शनमध्ये १०७.०० कोटी रुपये, कन्नड - १ कोटी, मल्याळम - ९ कोटी रुपये, तमिळ- २.५० कोटी, तेलुगू-५.२५ कोटी रुपये कलेक्शन केले. हा चित्रपट १९ मार्च रोजी रिलीज झाला होता. धुरंधर २ने पेड प्रीव्ह्यूमधून चांगली कमाई केली होती. ट्रेड एक्सपर्ट नुसार, धुरंधर-२ भारतात सर्वात मोठे कलेक्शन करू शकते.
भारतातील एकूण कलेक्शन (५ दिवस)
पहिला आठवडा
पेड प्रीव्यू शो : ४३ कोटी
गुरुवार: १०२.५५ कोटी
शुक्रवार: ८०.७२ कोटी
शनिवार: ११३ कोटी
रविवार: ११४.८५ कोटी
दुसरा आठवडा
सोमवार: ६५ कोटी
एकूण ५ दिवस : ५१९.१२ कोटी
तामिळनाडूमध्ये 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी
सोमवारी (२३ मार्च) एका वकिलाने मद्रास हायकोर्टात 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटावर तामिळनाडूमध्ये तातडीने बंदी घालण्याची विनंती केली. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुका २३ एप्रिल २०२६ रोजी होणार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, वकिलांनी सांगितले की, या चित्रपटात राजकीय विषय असून त्यात पक्षपाती राजकीय भाष्य आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असताना चित्रपट प्रदर्शित करू नये. निवडणुका संपल्यानंतर चित्रपट प्रदर्शित केला जाऊ शकतो. निवडणुकीपूर्वी, चित्रपटाचे प्रदर्शन आचार संहितेचे उल्लंघन ठरू शकते. पण, अद्याप या संदर्भात कोणतीही सुनावणी करण्यात आलेली नाही.