‘बिग बॉस मराठी’ नवा सिझन घेऊन येतोय ‘हा’ मराठमोळा अभिनेता

रितेश देशमुख
रितेश देशमुख

पुढारी ऑनलाईन डेस्क : संपूर्ण महाराष्ट्र गेली दोन वर्षे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होता, तो क्षण आता जवळ आला आहे. कलर्स मराठी आणि JioCinema वर 'बिग बॉस मराठी' चा नवा सिझन लवकरच नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर "बिग बॉस मराठी" चा व्हिडिओ शेयर केला आला आहे. या नव्या सिझनचे हे नवे सरप्राईज असणार असून या सिझनमध्ये एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

रितेश देशमुखच्या खास गोष्टी

  • रितेश देशमुख एक अभिनेता आणि निर्माता आहे
  • अलिकडेच त्याचा वेड हा चित्रपट गाजला
  • तो या चित्रपटात अभिनेत्री, पत्नी जेनेलिया डिसुझा सोबत दिसला
  • तुझे मेरी कसममध्ये तो जेनेलियासोबत पहिल्यांदा दिसला होता
  • या चित्रपटानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते
  • पुढे दोघे विवाहबंधनात अडकले

रितेश देशमुख करणार सूत्रसंचालन?

या वेळी बिग बॉस मराठीचे होस्टिंग बॅालीवूडचा स्टार, प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये बिग बॉसचा डोळा त्याच सोबत बॅालीवूडचा स्टयलिश हिरो, सुपरस्टार रितेश देशमुख देखील दिसत आहे.

हिंदीमधील यशानंतर 'बिग बॉस' हा कार्यक्रम मराठीतही सुरु झाला. "बिग बॉस मराठी" च्या पहिल्या चार सिझनने मराठी प्रेक्षकांची तुफान मने जिंकली आणि मराठमोळ्या थिमसह बिग बॉसच्या चारही सिझनची जोरदार चर्चा झाली. आता त्याच 'बिग बॅास' मराठीच्या नव्या सिझनची जोरात तयारी सुरू झालीय.

रितेश देशमुखचे गाजलेले चित्रपट

तुझे मेरी कसम, अलादीन, आउट ऑफ कंट्रोल, नमस्ते लंदन, अपना सपना मनी मनी, बँकचोर, हमशकल्स, हाउसफुल, हाउसफुल २, हाउसफुल ३, हाउसफुल 4, ओम शांती ओम, मस्ती, ग्रँड मस्ती, ग्रेट ग्रँड मस्ती, मिस्टर या मिस, लय भारी, वेलकम टू न्यूयॉर्क, बँजो, तेरे नाल लव्ह हो गया, हे बेबी, एंटरटेनमेंट, क्या कुल है हम, क्या सुपर कुल है हम, धमाल, मालामाल विक्ली, डबल धमाल, टोटल धमाल.
बिग बॅासचे घर ही नेहमीच रसिकांच्या औत्सुक्याची, कुतूहलाची बाब असते. बिग बॅास मराठीचे हे आलिशान घर आकार घेऊ लागले आहे. तसेच बिग बॅासच्या घरातील अतरंगी मोहरे यांचीही कसून निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या सिझनमध्ये बिग बॅासच्या या घरात आणखी काय काय नाविन्य असेल, काय एक्स्ट्रा गॅासिप अर्थात एक्स्ट्रा मनोरंजन पहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

हेदेखील वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news