Raja Shivaji box office collection day 10| रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ चित्रपट सुपरहिट; दुसऱ्या आठवड्यातही कमाईचा तडाखा कायम

Raja Shivaji box office collection day 10 | रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ सुपरहिट; दुसऱ्या आठवड्यातही कमाईचा तडाखा कायम, लवकरच शंभर कोटींचा क्लबमध्ये
Raja Shivaji movie
Raja Shivaji box office collectionpudhari photo
Published on
Updated on
Summary

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवत आहे. चित्रपटाने अवघ्या १० दिवसांत ८० कोटी रुपयांहून अधिक कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दमदार कथा, भव्य दृश्यरचना आणि कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षकांकडून चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

raja shivaji box office collection day 10

रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपट राजा शिवाजी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी तब्बल ८० कोटी रुपयांहून अधिक कमाई करत नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

चित्रपटाने पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळवला. पहिल्या आठवड्यातच ५० कोटी रुपयांचा टप्पा पार करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची कमाई स्थिर राहिली. दहाव्या दिवशी तगडी कमाई केल्याचे वृत्त समोर आले आहे.

Raja Shivaji movie
Salman Khan New Look - सलमान खानच्या नव्या लूकचा सोशल मीडियावर कहर; नयनतारासोबतच्या चित्रपटाची चर्चा रंगली

या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य कथा, दमदार दृश्ये आणि तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळले आहेत. विशेष म्हणजे सलमान खान आणि संजय दत्तचा अवतारही चर्चेत आहे.

दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाच्या कमाईत मोठी उसळी पाहायला मिळाली. १० दिवसांच्या यशस्वी वाटचालीनंतर, ६ कोटींहून अधिक कमाई करत या चित्रपटाची भारतातील एकूण कमाई ८१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या १० व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी या चित्रपटाने ६.८० कोटी रुपयांची कमा केलीय. तब्बल ४,०६३ शोजमधून झालेल्या या कमाईत शनिवारी ५.६० कोटी रुपयांची भर पडली. भारतातील आतापर्यंतची एकूण 'नेट' कमाई ६८.२५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर भारतातील एकूण Gross कमाई ८१.०० कोटी रुपयांपर्यंत गेली आहे.

Raja Shivaji movie
Riva Arora delivery boy misconduct incident| रीवा अरोराने सांगितला धक्कादायक अनुभव; डिलिव्हरी बॉयच्या वर्तनामुळे बोलवावं लागलं पोलिसांना

मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये रिलीज करण्यात आला होता. सध्याची कमाई पाहता ‘राजा शिवाजी’ लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दहा दिवसांचे एकूण कलेक्शन -

Day 1

हिंदी : ३.३५ कोटी; मराठी: ८ कोटी

Day 2

हिंदी : ३.४० कोटी; मराठी:७.१५ कोटी

Day 3

हिंदी : ४.२५ कोटी; मराठी: ७.७५ कोटी

Day 4

हिंदी :१.३५ कोटी; मराठी: ४.२५ कोटी

Day 5

(Hindi): Rs 1.55 crore; (Marathi): Rs 3.35 crore

हिंदी :१.५५ कोटी; मराठी: ३.३५ कोटी

Day 6

हिंदी :१.२५ कोटी; मराठी: ३ कोटी

Day 7

हिंदी :१.२५ कोटी; मराठी: २.७५ कोटी

Day 8

हिंदी :०.७० कोटी; मराठी: २.५० कोटी

Day 9

हिंदी :१.३२ कोटी; मराठी: ४.२५ कोटी

Day 10

हिंदी :१.८० कोटी; मराठी: ५ कोटी

एकूण कमाई : ६८.२५ कोटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news