Kantara Chapter 1: प्रचंड कमाईनंतर ‘कांतारा चॅप्टर 1’ आता OTT वर; जाणून घ्या ब्लॉकबस्टर चित्रपट कधी आणि कुठे पाहू शकता

Kantara Chapter 1 Hindi OTT Release: 848 कोटींची विक्रमी कमाई करणारा ‘कांतारा चॅप्टर 1’ आता 27 नोव्हेंबरपासून हिंदीत Prime Video वर उपलब्ध होणार आहे.
Kantara Chapter 1 Hindi OTT Release
Kantara Chapter 1 Hindi OTT ReleasePudhari
Published on
Updated on

Kantara Chapter 1 to Stream in Hindi on Prime Video: बहुप्रतिक्षित ‘कांतारा चॅप्टर 1’ अखेर हिंदीत OTT वर रिलीज होत आहे. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित हा भव्य चित्रपट 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आता हा चित्रपट हिंदी प्रेक्षकांसाठी OTTवर रिलीज होत आहे.

कन्नडसह तमिळ, तेलुगू आणि मल्याळममध्ये हा चित्रपट दोन आठवड्यांपूर्वीच OTTवर आला होता. मात्र हिंदीत तो आला नव्हता. आता Prime Video ने सांगितले आहे की, हिंदी व्हर्जन 27 नोव्हेंबर 2025 रोजी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे.

Kantara Chapter 1 Hindi OTT Release
Credit Score: आरबीआयचा नवा नियम; आता दर आठवड्याला अपडेट होणार क्रेडिट स्कोर; तुमच्यावर काय परिणाम होणार?

विक्रमी कमाई

‘कांतारा चॅप्टर 1’ हा 2022 च्या सुपरहिट ‘कांतारा’चा प्रीक्वेल असून, हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ₹125 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट प्रेक्षकांना इतका भावला की या चित्रपटाने फक्त 41 दिवसांत भारतात ₹618.73 कोटी, तर जागतिक स्तरावर तब्बल ₹848.15 कोटींची विक्रमी कमाई केली. विकी कौशलच्या ‘छावा’लाही मागे टाकत हा 2025 चा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे.

हिंदी व्हर्जन उशिरा का आले?

चित्रपट Prime Video वर आधीच रिलिज झाला असला तरी हिंदी व्हर्जन थांबण्याचे कारण म्हणजे OTT ची 8 आठवड्यांची विंडो. सिनेमागृहांतील रिलीजनंतर साधारण दोन महिने पूर्ण झाल्यावरच हिंदी डब करण्याचा नियम आहे. सुरुवातीला असा अंदाज होता की निर्मात्यांनी वेगळ्या OTT प्लॅटफॉर्मशी करार केला आहे; परंतु हिंदी रिलीजसुद्धा Prime Video वरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Kantara Chapter 1 Hindi OTT Release
Vikas Kohli: क्रिकेट जगतात खळबळ! विराटच्या भावाचा बीसीसीआयवर धक्कादायक आरोप; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

दैव पूजा, राजसत्ता आणि परंपरेचा संघर्ष

‘कांतारा चॅप्टर 1’ मध्ये कथा मूळ चित्रपटापूर्वीच्या काळात जाते. कदंब राजवंशाचा शासनकाल, दैव कोला परंपरेची सुरुवात, तिच्यामागील अध्यात्मिक श्रद्धा आणि राजसत्तेच्या क्रूरतेविरुद्ध उभे राहिलेले लोक, हे सगळे चित्रपटात प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे.

चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि मुख्य भूमिका ऋषभ शेट्टी यांनी साकारली आहे. त्यांच्यासोबत रुक्मिणी वसंत, जयराम, गुलशन देवैया, हरिप्रशांत, प्रमोद शेट्टी, दीपक राय पनाजे, माइम रामदास आणि इतर दमदार कलाकार आहेत. संगीत अजनीश लोकनाथ यांनी दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news