Kantara 1 Ott Release: 800 कोटी कमावणारा कांतारा महिन्याभरातच ओटीटीवर! कुठे आणि कधी पाहता येणार वाचा

कांतारा 1 अगदी अलीकडेच म्हणजे 2 ऑक्टोबरला थिएटरला रिलीज झाला होता
Entertainment
कांतारा ott releasepudhari
Published on
Updated on

रिषभ शेट्टीचा सिनेमा कांतारा चॅप्टर 1 ने जगाभारतील प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. कांताराचा प्रीक्वेल असलेल्या या सिनेमाचे लेखन, दिग्दर्शन आणि त्यात अभिनयही रिषभ शेट्टीने केला आहे. पण आता कांतारा 1 आता ओटीटीवर दिसण्यासाठी सज्ज झाला आहे. रुक्मिणी वसंत, गुलशन देवैया आणि जयराम सारख्या कलाकारांनी या सिनेमात दमदार अभिनय केला आहे. (Latest Entertainment News)

कांतारा आता ओटीटीवर दिसणार

कांतारा 1 अगदी अलीकडेच म्हणजे 2 ऑक्टोबरला थिएटरला रिलीज झाला होता. पण या सिनेमाच्या थिएटर रिलीजला एक महिन्याहून कमी काळ लोटला आहे. तरीही इतक्या कमी वेळात हा सिनेमा ओटीटीवर दिसण्यासाठी तयार असल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.

Entertainment
Sachin Chandwad: दुर्दैवी ! सिनेमा रिलीज काही दिवसांवरच पण.....त्यापूर्वीच अवघ्या 25 व्या वर्षी अभिनेत्याने जीवन संपवले

कधी आणि कुठे दिसणार?

कांतारा 1 प्राइम व्हीडियोवर 31 ऑक्टोबरला दिसणार आहे. सोमवारी याची अधिकृत घोषणा झाली आहे. यासोबत सिनेमातील एका महत्त्वाच्या दृश्याचा ट्रेलरही जारी केला आहे. हा सिनेमा तमिळ, तेलुगू आणि मल्याळममध्येही दिसणार आहे.

हिंदीमध्ये नाही दिसणार?

या सिनेमाच्या भाषांच्या यादीत हिंदी भाषेचा अभाव होता. त्यामुळे हा सिनेमा हिंदी व्हर्जनमध्ये रिलीज होणार नसल्याची चर्चा रंगली आहे. यावरही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. यावर पोस्टवर एकजण म्हणतो, ‘सिनेमा हिंदीमध्ये रिलीज केला तरच जास्त व्यूज मिळतील.’ तर एकजण म्हणतो याच्या रिलीजला एक महिना झाला नाही. तर लगेच हा ओटीटीवर दिसणार?

Entertainment
Actress Engagement Photo: मराठी सिनेसृष्टीत सनई चौघडे! या दोन अभिनेत्रींच्या साखरपुड्याचे फोटो आले समोर

कशावर बेतला आहे कांतारा 1 ?

कादंब राजवंशावर असलेला हा सिनेमा पंजूर्ली दैव, गुलिगा आणि चावुंडीच्या दंतकथांवर आधारित आहे. 2022 मध्ये आलेल्या कांताराचा हा सिनेमा प्रीक्वेल आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news