

Virat kohli brother accuses bcci team broken controversy: विराट कोहलीचा मोठा भाऊ विकास कोहली याने थेट बीसीसीआयवर निशाणा साधला आहे. गुवाहाटी टेस्टच्या चौथ्या दिवशी 549 धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया अडचणीत होती, तेव्हाच विकास याने सोशल मीडियावर सलग पोस्ट करत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांच्यावर गंभीर आरोप केले. काही वेळाने त्या पोस्ट डिलीट करण्यात आल्या, परंतु तेव्हाच त्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या.
विकास कोहली याने विराटच्या काळातील आणि सध्याच्या टीममधील फरक स्पष्टपणे दाखवला.
2012 ते 2024 या 12 वर्षांत भारताने घरच्या मैदानावर एकही टेस्ट मालिका गमावली नव्हती. विराटच्या नेतृत्वात भारतीय संघ जगातील सर्वात मजबूत संघांपैकी एक बनला होता.
विकासने थ्रेड्सवर लिहिलं:
"एक काळ होता आम्ही परदेशात जिंकण्यासाठी प्रयत्न करत होतो… आणि आज घरातच सामना वाचवण्यासाठी झगडतोय. जे चांगलं चाललं होतं, त्यात जबरदस्ती बदल केला की असंच होतं."
विकास कोहलीच्या दुसऱ्या पोस्टने तर क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडवली. त्यानी दावा केला की रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना टेस्ट टीममधून बाहेर पडायला भाग पाडले गेले. त्यांनी दक्षिण आफ्रिका आणि भारताच्या टीम स्ट्रक्चरची तुलना करत टीम इंडियाची निवड "गोंधळलेली" आहे असंं सांगितलं.
त्यानी लिहिले:
"भारताची रणनीती — सीनियर्सना बाहेर काढा, नंबर 3/4/5 चे अस्सल बॅटर्स हटवा, नंबर-3 वर गोलंदाज खेळवा आणि संपूर्ण टीम ऑलराउंडर्सने भरा."
तर दक्षिण आफ्रिकेबद्दल म्हणाला: "अस्सल ओपनर्स, अस्सल मिडल ऑर्डर, स्पेशलिस्ट स्पिनर, स्पेशलिस्ट पेसर्स… आणि फक्त एक ऑलराउंडर." आणि शेवटी मोठा प्रश्न उपस्थित केला: "आता विचारलं पाहिजे याला जबाबदार कोण?"
जुलै 2024 मध्ये गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून भारताचा टेस्ट प्रवास अत्यंत अस्थिर आहे—
बांग्लादेशविरुद्ध चांगली सुरुवात
परंतु न्यूझीलंडविरुद्ध पराभव
ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावली
WTC फायनलची संधी गमावली
विकास कोहलीच्या पोस्टमुळे बीसीसीआयच्या निर्णयक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रोहित–विराटला हटवल्याचा दावा, चुकीच्या टीम कॉम्बिनेशनवर टीका आणि घरच्या मैदानावरील कमकुवत कामगिरी, या सर्व मुद्द्यांमुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे.