

रणबीर कपूर, साई पल्लवी स्टारर रामायण चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात रणबीर करून भगवान राम यांच्या भूमिकेत तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत आहे. रावणाच्या भूमिकेत अभिनेता यश तर लक्ष्मण यांच्या भूमिकेत अभिनेता रवि दुबे आहे. राम यांचे बंधू लक्ष्मण यांची भूमिका साकारलेल्य़ा रवि दुबे विषयी जाणून घ्या.
रवि दुबेने स्वत: अनेक वेळा माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की, आपल्या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात कोणत्या वाईट परिस्थितीतून त्याला जावं लागलं होतं. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी तो मुंबईला तर आला. पण, नियतीला वेगळचं मान्य होतं. टेलिकॉम इंजीनिअरिंगचे शिक्षण मध्येच सोडून तो अभिनयाच्या विश्वात नशीब आजमवण्यासाठी उतरला.
रवि दुबेने राजीव गांधी प्रौद्योगिकी संस्थामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण घेण्यासाठी दिल्लीतून मुंबई आला. मुंबईत सुरुवातीच्या काळात भाड्याने राहण्यासाठी पैसे नव्हते. खाण्या-पिण्याचे संकट आलं. आर्थिक चणचणीमुळे तो मानसिक तणावात गेला. खरंतर, त्याला हे देखील माहित नव्हतं की, आपण डिप्रेशनच्या अवस्थेत आहोत.
तो इंजिनिअरिंगला होता आणि ४ वर्षे शिक्षण घेतलं. शिक्षणासाठी सर्व खर्च आई-वडिलांनी केला होता. दुसरीकडे रविला नोकरी मिळत नव्हती. तो सतत विचार करायचा की, माझ्या आई-वडिलांना माझ्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मी मी त्यांची इच्छा पूर्ण करू शकत नाहीये. रविला कुठलाच मार्ग सापडत नव्हता.
रविने सांगितलं होतं की, मी डिप्रेशनच्या अवस्थेत होतो, सातत्याने ही खंत मनात सलत राहायची. मी चालायचे तर ते एका झोम्बीसारखं. माझ्या आजूबाजूला काय घडतंय, याचा मला विसर पडलेला. पण, एशी वेळ आली की, मला वाटलं आपण जीवन संपवावं. डिप्रेशनच्या काळात तो खूप वाईट अवस्थेतून गेल्याचे सांगतो.
स्वत:ला कसं सावरलं रवि दुबेनं?
रवि दुबेने खूप विचार केल्यानंतर स्वत:च्या शांतीसाठी मेडिटेशनचा मार्ग निवडला. लोकांशी बोलायला सुरु केलं. परिवाराला, मित्रांना आपल्या अडचणींबद्दल सांगितलं. तेव्हा रवि दुबेने सांगितलं की, आपल्याला मार्ग मिळाला.
त्याने एक मॉडल म्हणून काम करायला सुरुवात केली. करिअरच्या सुरुवातीला त्याला दूरदर्शनवरील टीव्ही मालिका मिळाली. सोनी टीव्हीची मालिका शो 'सास बिना ससुराल' आणि झी टीव्ही 'जमाई राजा'तून घरोघरी त्याला ओळख मिळाली. पुढे रिॲलिटी शो 'नच बलिये 5' आणि 'फअयर फॅक्टर: खतरों के खिलाडी 8' मध्ये भाग घेतला. त्याने नमित मल्होत्राच्या सध्या चर्चित 'रामायण' मध्ये लक्ष्मणची की भूमिका साकारलीय. रामायण हा चित्रपट नकताच 5 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालाय.
2016 मध्ये, रवि दुबेने प्रोडक्शन हाऊस ड्रीमियाटा एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली होती. उडारिया, गंगा माई की बेटियां, तू जूलियट जट्ट दी, यासारख्या टिव्ही मालिकांची निर्मिती केली.
रवि दुबेविषयी थोडक्यात...
रविचा जन्म गोरखपूर, उत्तर प्रदेशमध्ये झाला होता. आणि तो लहानाचा मोठा दिल्लीत झाला.