Ramayana Yash Success Inspirational Story|थिएटरमध्ये फरशा पुसायचा यश, अभिनेत्याला माहित नव्हतं की, एक दिवस आपण एवढे मोठे स्टार होऊ..

Ramayana Actor Yash Success Inspirational Story | थिएटरमध्ये फरशा पुसायचा यश, अभिनेत्याला माहित नव्हतं की, एक दिवस आपण एवढे मोठे स्टार होऊ....
actor Yash
Ramayana Yash Success Inspirational Storypudhari photo
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री साई पल्लवी स्टारर रामायणची जोरदार चर्चा सुरु आहे. पण आणखी एका अभिनेत्याची चर्चा सुरु आहे ती म्हणजे साऊथ अभिनेता केजीएफ स्टार यशची. यशने रामायण चित्रपटात रावणाची भूमिका साकारलीय अन्‌ ती भूमिका आपण सर्वात चांगल्या पद्धतीने साकारू शकतो, असा दावा यशने एका मुलाखतीत केला आहे.

actor Yash
Yash Toxic The Movie | खतरनाक टीजर, Raya च्या भूमिकेतून केजीएफ स्टार यशचे थक्क करणारे सीन्स

रावणाचा क्रूरपणा आपण चांगल्या पद्धतीने अभिनयातून दाखवू शकतो, असे यशचे म्हणणे आहे. तो नेहमी म्हणतो की, मला जे करायचं आहे ते करणारचं. जिद्द, मेहनत, संघर्ष आणि लोकांच त्याच्यावरील प्रेम या सर्वच गोष्टींमुळे तो हे यशाचे शिखर पादाक्रांत करू शकलाय, असे तो म्हणतो.

actor Yash
Rishabh Met PM Modi : केजीएफ स्टार यश-कांतारा फेम ऋषभ शेट्टीने घेतली मोदींची भेट

आज साऊथ चित्रपट इंडस्ट्रीत केवळ त्याचा प्रचंड फॅन बेसच नव्हे तर तो एक हाएस्ट पेड कलाकार म्हणून चर्चेत आहे. एका एका चित्रपटाला तो ५० -५० कोटी रुपये मानधन घेतो, दुसरीकडे त्याच चित्रपटांच्या निर्मितीचे बजेट खूप कमी असते. पण, चित्रपट प्रदर्शित झाल्य़ानंतर तो ब्लॉकबस्टर करण्य़ात यशचा हात मोठा आहे. सर्वाधिक फायदा करून देणारा सुपरस्टार यश म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. परंतु, यशाची शिखरे चढायला त्याने घेतलेली प्रचंड मेहनत, संघर्ष चर्चेत येणे, वाखाणण्याजोगे आहे.

मजल दरमजल करत यश मिळवणं, त्याच्यासाठी किती कठीण होतं आणि आताही सुपरस्टार झाल्यानंतर तो म्हणतो की, हा संघर्ष अद्याप संपलेला नाही. तो अजुनही सुरुच आहे.

मस्तीखोर असल्य़ाने वडिलांचा प्रचंड मार

बालपणात यशला वडिलांनी इतकं मारलं... इतक्या मस्तीखोर यशला पाहून सर्वजण म्हणायचे की, हा आयुष्यात काहीही करू शकणार नाही. यशचे वडील बस ड्रयव्हर होते. प्रतिदिवस १४ रुपये मानधन होतं. पण, यशला कधीच वाटलं नाही की, आपल्याकडे एखादी गोष्ट नाहीये. यश जसजसा मोठा होत गेला, त्याला वा़टू लागले की, आपल्याकडे चांगले कपडे असावेत. मग, कॉलेजला जाण्यासाठी यशने स्वत:साठी एक दुचाकी खरेदी केली होती. यशचा ॲटिट्ूड कॉलेजमध्ये हिरोसारखाच होता. डान्स पाहून कॉलेजचे शिक्षक यशला हिरोच म्हणायचे. खिशात एक रुपयाही नव्हता पण तरीही स्टाईल मारायचा. पण त्याला कुठे माहित होतं की, तो एक दिवस इतका मोठा स्टार बनेल.

अभिनयाची, डान्सची आवड त्याला होतीच. त्याने थिएटर जॉईन केलं. अभिनयाची प्रॅक्टिस करताना झाडू मारणे, फरशी पुसणे, चहा देणे, अशीही कामे त्याने केली. कन्नड टीव्हीमध्ये साईड कलाकार म्हणून त्य़ाला छोट्या भूमिका मिळत गेल्या. नेहमी प्रेमाने टीका करणाऱ्या त्याच्या वडिलांनी यशला नेहमीच पाठिंबा दिला. कर्नाटकात नाव कमावण्यासाठी यशला खूप काम करावं लागलं. कर्नाटकात टिव्ही कलाकार आणि नंतर काही चित्रपट मिळत गेले. पण एका रात्रीत त्याचं नशीब चमकलं ते 'केजीएफ'मुळे. लोकांनी ज्या अर्थी त्याच्यावर, त्याच्या अभिनयावर प्रेम दाखवंल, ते यशसाठी सर्वांत महत्वाची गोष्ट आहे. किंबहुना, यश म्हणतो की, लोकांनी मला यशाच्या पायऱ्यांवर चढवलं आहे.

रावणाच्या भूमिकेसाठी यशने केलीय इतकी तयारी

पौराणिक चित्रपट 'रामायण'मध्ये रावणाच्या लूकसाठी यशने खास तयारी केली. रावण सादर करण्यासाठी अभनियात त्याने जीव ओतला आहे. त्याने प्रभावशाली रावण दिसण्यासाठी ३३ किलो वजनाचा पोषाख घातला होता. हा पोशाख डिझायनर सानिया सरधरियाने डिझाईन केला होता.

एका मुलाखतीत सानिया म्हणाली, यशच्या पोशाखाचे वजन ज्वेलरी मिळून जवळपास १६-२० किलो बोते. पण आमच्याकडे आणखी काही वजनदार पीस होते, ज्यामुळे लंकेशी संबंधित रावण लुक, त्याच्या लग्नाचा ड्रेस, सूर्पणखाच्या लग्नात घातलेला ड्रेस. असे मिळून जवळपास ३०-३३ किलो वजनाचा पोषाख होता." सानिया म्हणाली होती की, केवळ मुकूटाचेच वजन १.८ किलो झालं होतं. मुकूटसाठी तर अनेक प्रयोग करावे लागले.

रामायण विषयी...

नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा, यश निर्मित रामायण: राईज ऑफ ए लीजेंडमध्ये रणबीर कपूर भगवान राम, साई पल्लवी माता सीता आणि यश रावणच्या भूमिकेत आहे. पहिला भाग ५ नोव्हेंबरला रिलीज झालाय. तर दुसरा भाग २०२८ मध्ये रिलीज होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.