रात्रीस खेळ चाले- 2: सुशल्या इतकी आहे बोल्ड, शेवंतालाही टाकलंय मागे

रात्रीस खेळ चाले- 2: सुशल्या इतकी आहे बोल्ड, शेवंतालाही टाकलंय मागे

पुढारी ऑनलाईन : 'रात्रीस खेळ चाले'मध्ये सुशल्या या भूमिकेतील अभिनेत्री इतकी बोल्ड असेल, असा विश्वास देखील बसणार नाही. शेवंताची मुलीच्या भूमिकेत सुशल्याला दाखवण्यात आलंय. स्लिम ट्रीम असणाऱ्या सुशल्या हिचं खरं नाव आहे – पूर्णिमा डे. तिच्याविषयी जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीचं आवडेल. पूर्णिमा डे रिअल लाईफमध्ये किती ग्लॅमरस आहे पाहा.

रात्रीस खेळ चाले या मालिकेपूर्वी ती 'तुला पाहते रे' या मालिकेत काम केलं आहे. तसेच 'गर्ल्स हॉस्टेल' या मालिकेतदेखील काम केलं आहे.

'तुला पाहते रे' मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचलेली. पण, अधिक लोकप्रियता मिळाली ती रात्रीस खेळ चाले -२ मधून. तुला पाहते रे मध्ये तिने जयदीप सरंजामेची पत्नी सोनियाचे पात्र साकारले होते.

पूर्णिमा 'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेत अण्णा नाईक आणि शेवंताच्या मुलगी सुषमाची भूमिका ती साकारतेय. मालिकेत तिला स्टायलिश दाखवण्यात आलंय. पण, ती मुळात खासगी आयुष्यातही तेवढीच ग्लॅमरस आहे.

अनेक सुंदर फोटोंनी तिचे इन्स्टाग्राम भरलेले आहे. तिने खास फोटोशूट केले आहेत. या फोटोशूटमध्ये तिला पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

लॉकडाउननंतर ती 'सोनी मराठी' वाहिनीवरील 'सिंगिंग स्टार' कार्यक्रमात झळकली होती. अभिनेत्री असण्यासोबतचं पूर्णिमा एक मॉडेलही आहे. तिने स्पा, कपड्यांच्या जाहिरातीसाठी मॉडेलिंगही केले आहे.

पूर्णिमाने काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे. पूर्णिमा आपल्या फिटनेसकडेही लक्ष देते. त्यामुळेचं ती इतकी फिट, स्लिम आणि ग्लॅमरस आहे.

शाहरुखची जबरा फॅन सुशल्या

पूर्णिमा ही शाहरूख खानची जबरदस्त फॅन आहे. बालपणापासूनच तिला शाहरुख आवडतो.

वयाच्या तिसऱ्या वर्षी पूर्णिमाने शाहरुखचा 'दीवाना' हा चित्रपट पाहिला होता. शाहरुखला अनेक वेळा भेटण्याची मिळालेली संधी तिने गमावलीय. आपण शाहरुखच्या समोर गेलो तर कशाप्रकारे व्यक्त होऊ, हे सांगू शकते न्हा, असे पूर्णिमा म्हणते. त्यामुळे किंग खानला अनेकवेळा संधी मिळून देखील तिने ती गमावलीय.

…तर डॉक्टर झाली असती पूर्णिमा

पूर्णिमाने आयुर्वेदीक डॉक्टरकीचे म्हणजेच बी.ए.एम.एसचे शिक्षण घेतले आहे. पण, अभिनेत्री होण्यासाठी तिने डॉक्टर न कलाक्षेत्रात पदार्पण केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news