Dhurandhar 2 OTT Release: ‘धुरंधर 2’ OTT वर कधी येणार? Netflix नंतर आता JioHotstar ने केली मोठी घोषणा

Dhurandhar 2 OTT Release: रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’च्या OTT रिलीजची चाहत्यांना मोठी प्रतीक्षा असून Netflix नंतर आता JioHotstar नेही मोठा इशारा दिला आहे.
Dhurandhar 2 OTT Release
Dhurandhar 2 OTT ReleasePudhari
Published on
Updated on

Dhurandhar 2 OTT Release: रणवीर सिंहच्या बहुचर्चित ‘धुरंधर 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आता हा चित्रपट OTT वर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, चित्रपटाच्या OTT रिलीजबाबत गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. कारण, आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाच्या रिलीजची घोषणा झाली होती, पण भारतातील प्रेक्षकांना तो नेमका कधी पाहायला मिळणार, याबाबत स्पष्टता नव्हती.

दरम्यान, आता या प्रतीक्षेला अखेर दिशा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. Netflix ने आधीच ‘धुरंधर 2’च्या OTT रिलीजची तारीख जाहीर केली होती. परदेशातील प्रेक्षकांसाठी हा चित्रपट 15 मेपासून Netflix वर स्ट्रीम होत आहे. मात्र, भारतात हा चित्रपट JioHotstar वर प्रदर्शित होणार असला तरी त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नव्हती.

यामुळे सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी “भारतामध्ये रिलीज उशिरा का?” असा प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चांदरम्यान आता JioHotstar ने आपल्या X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना मोठा हिंट दिला आहे.

Dhurandhar 2 OTT Release
Bank Loan EMI: इंधन दरवाढीचा दुहेरी फटका! महागाईसोबत कर्जाचा हप्ताही वाढणार? RBI लवकरच मोठा निर्णय घेणार

चित्रपटाचा एक क्लिप शेअर करत JioHotstar ने लिहिले, “लेडीज अँड जेंटलमेन, तुम्ही यासाठी तयार आहात का?” तसेच व्हिडिओमध्ये “लवकरच मोठा धमाका होणार” असा संदेशही देण्यात आला आहे. मात्र, ‘धुरंधर 2’ नेमकी कोणत्या तारखेला स्ट्रीम होणार, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

विशेष म्हणजे, OTT वर्जन थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या आवृत्तीपेक्षा वेगळं असणार आहे. निर्मात्यांनी याला ‘अनकट आणि रॉ व्हर्जन’ असं नाव दिलं आहे. थिएटरमध्ये काही दृश्यं कापण्यात आली होती, ती आता OTT वर्जनमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना अधिक विस्तृत अनुभव मिळण्याची शक्यता आहे.

Dhurandhar 2 OTT Release
Raja Shivaji BO Day 13: ‘राजा शिवाजी’ने सर्व विक्रम मोडले! 13 दिवसांत सगळा खर्च वसूल; आतापर्यंत किती कोटी कमावले?

रिपोर्ट्सनुसार, थिएटर वर्जन सुमारे 3 तास 49 मिनिटांचे होते, तर OTT वर्जन जवळपास 3 तास 52 मिनिटांचे असणार आहे. तसेच भारतातील OTT हक्कांसाठी JioHotstar ने तब्बल 150 कोटी रुपये मोजल्याची चर्चा आहे.

आता फक्त अधिकृत तारखेची घोषणा बाकी असून, रणवीर सिंहच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news