Bank Loan EMI: इंधन दरवाढीचा दुहेरी फटका! महागाईसोबत कर्जाचा हप्ताही वाढणार? RBI लवकरच मोठा निर्णय घेणार

Bank Loan EMI: पेट्रोल, डिझेल आणि CNG दरवाढीमुळे महागाई वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम थेट कर्जाच्या EMI वर होऊ शकतो.
Bank Loan EMI
Bank Loan EMIPudhari
Published on
Updated on

Petrol Diesel CNG Price Hike Impact On Loan EMI: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आता भारतातील सर्वसामान्यांच्या खिशावर दिसू लागला आहे. जागतिक ऊर्जा संकट आणि होर्मुझ सामुद्रधुनीत (Hormuz Strait) पुरवठा साखळीवर निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे देशात पेट्रोल, डिझेल आणि CNG च्या किमती वाढल्या आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांपर्यंत वाढ झाली असून, CNG देखील 2 रुपयांनी महाग झाला आहे. यामुळे महागाई वाढली आहे.

महागाई वाढली की सर्वसामान्यांचा खर्च वाढतोच, पण त्याचबरोबर गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्जाच्या EMI देखील वाढू शकतो. त्यामुळे “इंधन महागलं तर माझ्या कर्जाच्या हप्त्याशी त्याचा काय संबंध?” असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. याचं उत्तर RBI च्या रेपो रेटमध्ये दडलं आहे.

महागाई वाढली की RBI रेपो रेट का वाढवते?

देशात वस्तू आणि सेवांच्या किंमती झपाट्याने वाढू लागल्या आणि महागाई RBI ने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा वर गेली, तर केंद्रीय बँक रेपो रेट वाढवण्याचा निर्णय घेते. साधारणपणे RBI महागाई 4 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचा प्रयत्न करते. मात्र, अन्नधान्य, इंधन आणि आवश्यक वस्तू महाग होऊ लागल्या की महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदर वाढवण्याचे पाऊल उचलले जाते.

रेपो रेट म्हणजे नेमकं काय?

रेपो रेट म्हणजे RBI ज्या व्याजदराने बँकांना कर्ज देते तो दर. जेव्हा RBI हा दर वाढवते, तेव्हा बँका ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्जांवरील व्याजदर वाढवतात.

Bank Loan EMI
Meta Layoffs: मार्क झुकरबर्गचा मोठा निर्णय; ८,००० कर्मचाऱ्यांची करणार कपात, कारण वाचून थक्क व्हाल

मग EMI कसा वाढतो?

तुमचं होम लोन, कार लोन किंवा पर्सनल लोन जर फ्लोटिंग इंटरेस्ट रेटवर असेल, तर रेपो रेट वाढल्याचा परिणाम थेट तुमच्या EMI वर होऊ शकतो. बँकांनी व्याजदर वाढवल्यानंतर दोन गोष्टी घडतात. एकतर तुमचा मासिक हप्ता (EMI) वाढतो किंवा कर्ज फेडण्याचा कालावधी वाढतो.

उदाहरणार्थ, जर तुमचं 30 लाख रुपयांचं होम लोन असेल आणि व्याजदरात 0.5 टक्क्यांनी वाढ झाली, तर तुमचा EMI दरमहा काही हजार रुपयांनी वाढू शकतो. काही वेळा EMI कायम ठेवून बँका कर्जाचा कालावधी वाढवतात, पण तरीही तुम्हाला अधिक व्याज भरावं लागतं.

Bank Loan EMI
CNG Price Hike: LPG आणि दुधानंतर आणखी एक झटका; आता CNGही झाला महाग, किती वाढली किंमत?

महागाईचा तुमच्या खिशावर दुहेरी परिणाम

इंधन महागल्याने प्रवास, वाहतूक, अन्नपदार्थ आणि रोजच्या गरजेच्या वस्तूंचे दर वाढतात. त्याचवेळी RBI ने रेपो रेट वाढवल्यास कर्जही महाग होते. म्हणजेच, एकीकडे दैनंदिन खर्च वाढतो आणि दुसरीकडे EMI चा ताणही वाढण्याची शक्यता निर्माण होते.

त्यामुळे पुढील काही महिन्यांत महागाईचा वेग, जागतिक परिस्थिती आणि RBI ची भूमिका याकडे कर्जदारांचे विशेष लक्ष असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news