Ranveer Singh Don 3 Controversy: ‘डॉन 3’ वादाला नवे वळण! रणवीर सिंगचा मोठा पलटवार; FWICE ला पाठवली कायदेशीर नोटीस

Ranveer Singh Don 3 Controversy: ‘डॉन 3’मधून बाहेर पडल्यानंतर रणवीर सिंगने FWICE ला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
Ranveer Singh Don 3 Controversy
Ranveer Singh Don 3 ControversyPudhari
Published on
Updated on

Ranveer Singh Don 3 Controversy: ‘डॉन 3’ चित्रपटातून बाहेर पडल्याच्या वादामुळे चर्चेत असलेला अभिनेता रणवीर सिंग आता थेट कायदेशीर लढाईच्या मैदानात उतरला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) रणवीरविरोधात जारी केलेल्या ‘नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह’नंतर अभिनेत्यानेही पलटवार करत संस्थेला कायदेशीर नोटीस बजावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर सिंगने 2 जून रोजी FWICE ला औपचारिक कायदेशीर नोटीस पाठवली. या नोटिशीद्वारे त्याने संस्थेच्या निर्णयाला आव्हान दिले असून, अशा प्रकारचा आदेश देण्याचा अधिकार FWICE कडे नसल्याचा दावा केला आहे. नोटिशीत नेमक्या कोणत्या मागण्या करण्यात आल्या आहेत, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, या प्रकरणावर अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यासाठी FWICE ने 3 जून रोजी पत्रकार परिषद बोलावली आहे.

नेमका वाद कशामुळे सुरू झाला?

हा संपूर्ण वाद ‘डॉन 3’ चित्रपटाभोवती फिरत आहे. वृत्तांनुसार, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता फरहान अख्तर यांच्या ‘डॉन 3’मधून रणवीर सिंगने शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधी माघार घेतली. त्यामुळे निर्मात्यांचे सुमारे 45 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला.

प्री-प्रॉडक्शनवरील खर्च, शूटिंगचे नियोजन आणि रणवीरसाठी करण्यात आलेल्या विशेष तयारीमुळे हे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर FWICE ने रणवीरविरोधात नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह जारी करत आपल्या संलग्न संघटनांना त्याच्याशी संबंधित कोणत्याही प्रोजेक्टवर काम न करण्याचे निर्देश दिले.

नंतर FWICE ने हा निर्णय ‘बंदी’ नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, उद्योगक्षेत्रात आणि माध्यमांमध्ये या कारवाईकडे ‘बॅन’ म्हणूनच पाहिले गेले.

Ranveer Singh Don 3 Controversy
Kevin Kunta : पेड्डी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये राम चरण पेक्षा त्‍याच्या बॉडीगार्डचीच चर्चा अधिक का होतेय? काय आहे केविनची कहाणी?

रणवीरने यापूर्वी काय प्रतिक्रिया दिली होती?

FWICE च्या निर्णयानंतर रणवीर सिंगने थेट प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. त्याच्या प्रवक्त्याद्वारे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले होते की, रणवीर सिंगला चित्रपटसृष्टीतील सर्व सहकाऱ्यांबद्दल आणि ‘डॉन’ फ्रँचायझीशी संबंधित प्रत्येक व्यक्तीबद्दल अत्यंत आदर आहे.

व्यावसायिक मतभेद आणि वैयक्तिक नातेसंबंध हे सन्मान, परिपक्वता आणि परस्पर आदराने हाताळले जावेत, अशी त्याची भूमिका असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले होते.

Ranveer Singh Don 3 Controversy
Kala Hiran Controversy: सलमानच्या नोटिशीनंतरही माघार नाही! 'काळा हिरण' दिग्दर्शकाचा थेट इशारा; वाद आणखी पेटणार?

‘डॉन 3’चे भवितव्य अद्याप अनिश्चित

2023 मध्ये ‘डॉन 3’ची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. एका टीझरद्वारे रणवीर सिंगला नव्या ‘डॉन’च्या भूमिकेत सादर करण्यात आले होते. चित्रपटाच्या शूटिंगला 2026 मध्ये सुरुवात होण्याची अपेक्षा होती.

मात्र, आता रणवीरच्या एक्झिटनंतर चित्रपटाचे भवितव्य अनिश्चित झाले आहे. निर्मात्यांकडून नव्या कलाकाराची घोषणा करण्यात आलेली नाही आणि शूटिंगच्या वेळापत्रकाबाबतही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, रणवीर आणि FWICE यांच्यातील हा वाद आता न्यायालयापर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, बॉलिवूडमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news