Kevin Kunta : पेड्डी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये राम चरण पेक्षा त्‍याच्या बॉडीगार्डचीच चर्चा अधिक का होतेय? काय आहे केविनची कहाणी?

आज एका प्रमोशनदरम्यान बॉडीगार्ड केविन कुंटा (Kevin Kunta) ने जान्हवी कपूरला कसे वाचवले याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल, सोशल मिडीयावर केविनच्या चर्चा
Ramcharan Bodyguard Kevin kunta
Ramcharan Bodyguard Kevin kunta
Published on
Updated on

Ramcharan Bodyguard Kevin kunta : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण सध्या त्याचा आगामी स्पोर्ट्स-अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट 'पेद्दि' (Peddi) च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान राम चरणपेक्षाही जास्त त्याचा पर्सनल बॉडीगार्ड केविन कुंटा (Kevin Kunta) सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चेत आला आहे. केवीनची स्टाईल, त्‍याचे दिसणे, तसेच त्‍याची व्यायाम करण्याची पद्धत, त्‍याचे मानधन यावर सध्या सोशल मिडीयावर गडदा उडाला आहे. जाणून घेऊ काय आहे केवीनची कहाणी

कोण आहे केवीन कुंटा

केविन कुंटा हा मुळचा इटलीचा असून तो फ्रोफेशनल फाटर आहे. केविन हा मूळचा पश्चिम आफ्रिकेतील गाम्बिया (Gambia) देशाचा रहिवासी असून सध्या तो इटलीतील फ्लोरेन्स (Florence) शहरात राहतो. त्याचे खरे नाव 'अब्दू कदीर सोव' (Abdou Kadirr Sowe) असून त्याचा जन्म १९९८ मध्ये झाला आहे. गाम्बिया रेझ्लिंग असोसिएशनमध्ये त्याला 'मामा लॅमिन ऑफ बारा' म्हणून ओळखले जाते.

इंटरनॅशनल MMA फायटर

केविन हा केवळ सामान्य सुरक्षा रक्षक नसून आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रोफेशनल मिक्स मार्शल आर्ट्स (MMA) फायटर आहे. याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. तो युरोपच्या मिडलवेट डिव्हिजनमध्ये खेळतो. या केविनच्या नावावर ४ विजय आणि ६ पराभव आहेत. त्याने २०२१ मध्ये इटलीच्या राष्ट्रीय MMA टीमचे प्रतिनिधित्व केले होते आणि त्याचा शेवटचा सामना नोव्हेंबर २०२५ मध्ये झाला होता.

खरच दोन लाख दिवसा पगार देतो रामचरण?

एका मुलाखतीमध्ये रामचरण म्हणतो की मी व माझ्या व कुंटूंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केवीनवर आहे. आम्ही परदेशात जातो तसेच भारतात कुठेही असतो त्‍यावेळी केवीन हा कायम सोबत असतो. तसेच अनेक व्हिडीओमध्येही दिसते की केवीन हा रामचरणच्या पाठीमागे सावली सारखा उभा असतो. रामचरण त्‍याला 2 लाख रुपये प्रतिदिवस मानधन देतो असा दावा केला जातो. तसेच अनेक ठिकाणी तो 4 लाख चार्ज करतो असे म्हटले आहे. जर या अफवा खऱ्या असतील, तर तो भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात महागड्या बॉडीगार्ड्सपैकी एक ठरला आहे. तसेच केविन गेल्या ४ वर्षांपासून राम चरणच्या कुटुंबाला सुरक्षा देत आहे.

Ramcharan Bodyguard Kevin kunta
Janhvi Kapoor | 'पेड्डी'च्या प्रमोशनमध्ये जान्हवीशी चाहत्याने असे कृत्य केले की...राम चरणच्या 'या' खास बॉडीगार्डने वाचवले, व्हिडिओ व्हायरल

लूकचीही चर्चा

केवीनची जबरदस्त पर्सनॅलिटी लक्ष वेधून घेते. तो उंचापूरा व बॉडीबिल्डर आहे. जबरदस्त ६ फूट ५ इंच फिटनेस, भारदस्त शरीरयष्टी, फॅशन सेन्स आणि स्टायलिश लूक (काळा सूट आणि महागडी घड्याळे) यामुळे त्याने नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे.

नुकत्याच झालेल्या 'पेड्डी' चित्रपटाच्या एका प्री-रिलीज कार्यक्रमात राम चरणसारखेच कपडे घातलेला एक चाहता सुरक्षा कडे तोडून स्टेजच्या दिशेने अतिशय वेगाने धावला. परिस्थिती गंभीर होण्यापूर्वीच केविनने अत्यंत चपळाईने त्या चाहत्याला पकडले आणि सुरक्षित अंतरावर दूर नेले. हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावेळी चित्रपटाची हिरॉईन जान्हवी कपूर ही घाबरलेली दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news