Ranveer Singh-Arsenal star Declan Rice-'डॉन 3' वाद सुरू असतानाच रणवीर सिंह बुडापेस्टमध्ये; डेक्लन राईससोबतचा फोटो चर्चेत

'डॉन 3' वाद सुरू असतानाच रणवीर सिंह बुडापेस्टमध्ये; डेक्लन राईससोबतचा फोटो चर्चेत
Ranveer Singh-Arsenal star Declan Rice
Ranveer Singh-Arsenal star Declan RicePudhari photo
Published on
Updated on

बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंह बुडापेस्टमध्ये आर्सेनलचा स्टार मिडफिल्डर डेक्लन राईस याला भेटला. या भेटीचा एक फोटो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे, जो रणवीरने किशोर कुमार यांच्या 'तेरे जैसा यार कहाँ' या प्रसिद्ध गाण्यासोबत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फरहान अख्तरच्या 'डॉन ३' या चित्रपटातून अचानक बाहेर पडल्यामुळे आणि एफडब्ल्यूआयसीईने (FWICE) असहकाराचा आदेश जारी केल्यामुळे निर्माण झालेल्या वादांमुळे अलीकडे चर्चेत असलेल्या रणवीर सिंहसाठी ही भेट विशेष दिलासादायक ठरली आहे. या सगळ्यात, फुटबॉलच्या मैदानावर आर्सेनलचे नेत्रदीपक यश आणि डेक्लन राईससोबतचा त्याचा हा फोटो चर्चेचा विषय बनला आहे.

रणवीरने हंगेरियनला भेट देण्यामागील कारण अस्पष्ट आहे.पण या फोटोने फुटबॉल आणि बॉलिवूड चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. डॉन ३ मधून बाहेर पडण्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर रणवीर सिंहने पहिली पोस्ट शेअर केलीय. इन्स्टा स्टोरीवर आर्सेनलचा स्टार डेक्लन राईस सोबतचा फोटो लावून त्याने अबाऊट लास्ट नाईट अशी कॅप्शन देत रेड हाटर् इमोजी शेअर केला आहें. आदित्य धरच्या 'धुरंधर' फ्रँचायझीच्या यशानंतर, रणवीर आता 'प्रलय' या पोस्ट-अपोकॅलिप्टिक झोम्बी थ्रिलर चित्रपटाची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. तो या चित्रपटातून निर्माता म्हणून पदार्पण करणार आहे.

Ranveer Singh-Arsenal star Declan Rice
Ankita Lokhande troll |अबू धाबी सहलीतील फोटोंमुळे अंकिता लोखंडे ट्रोल; अखेर सोशल मीडियावर नेटकरी म्हणालेच..

रणवीर सिंह डेक्लन राईससोबत बुडापेस्टमध्ये दिसला. रणवीर 'डॉन ३' तून एक्झिट केल्यानंतर वाद निमार्ण झाला आहे. ज्यामुळे बरीच होतेय. रणवीर सिंगची फुटबॉलची आवड सर्वश्रुत आहे आणि तो आर्सेनलचा मोठा चाहता आहे. त्याची डेक्लन राईससोबतची भेट या दोन्ही खेळाडूंच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

Ranveer Singh-Arsenal star Declan Rice
Suriya success|'Karuppu'च्या यशानंतर Aamir Khan ची थेट दाद; त्रिशा कृष्णनच्या चित्रपटाने विजयच्या 'वारिसू'लाही टाकले मागे

डॉन ३ वाद

'डॉन ३' मधून रणवीर सिंहने माघार घेतल्याने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने त्याच्या विरोधात असहकाराचा आदेश जाहीर केला. त्यानंतर काही दिवसांनी हा फोटो व्हायरल झाला आहे.

रणवीर सिंहचे आगामी प्रोजेक्ट

आदित्य धरच्या 'धुरंधर' फ्रँचायझीच्या यशानंतर, रणवीर आता 'प्रलय' या पोस्ट-अपोकॅलिप्टिक झोम्बी थ्रिलर चित्रपटाची तयारी करत आहे, ज्याद्वारे तो निर्माता म्हणून पदार्पण करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news