Ankita Lokhande troll |अबू धाबी सहलीतील फोटोंमुळे अंकिता लोखंडे ट्रोल; अखेर सोशल मीडियावर नेटकरी म्हणालेच..

अबू धाबी सहलीतील फोटोंमुळे अंकिता लोखंडे ट्रोल; अखेर सोशल मीडियावर नेटकरी म्हणालेच..
vicky jain- ankita lokhande
Ankita Lokhande faces trolling due to wear hijab pudhari photo
Published on
Updated on

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या पती विकी जैनसोबत अबू धाबीच्या ट्रीपवर आहे.तेथून काही व्हेकेशन फोटोज तिने शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. अंकिताने अबुधाबीमधील अनेक फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती शहरात फिरताना दिसते. एका रेस्टाॅरेंटमध्ये ती विकीसोबत बसलेली दिसते. तर आनंदाची काही क्षणचित्रे तिने शेअर दिसत आहे. यातील काही फोटोंमध्ये अंकिता वेस्टनर् ड्रेसमध्ये दिसत असली, तरी काही फोटोंमध्ये तिने हिजाब परिधान केल्याचे दिसून आले.

vicky jain- ankita lokhande
Ranveer Singh Don 3 controversy: आता बॉलिवूडमध्ये कलाकारांसाठी नवे नियम येणार?

पोस्टमध्ये अंकिताने काय लिहिलं-

ही पोस्ट शेअर करताना अंकिताने कॅप्शन दिली की, माझ्या कॅमेरा रोलमधील अबू धाबीचे थोडेसे प्रेम फिरणे, हसणे आणि आठवणी बनवणे. हे फोटो व्हायरल होताच सोशल मीडिया युजर्सनी कमेंट द्यायला सुरुवात केली. अनेक चाहत्यांनी विकी जैन आणि अंकिताच्या फोटोंचे कौतुक केले.तसेच त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांच्या निवडीचाही आदर केला.तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी तिने हिजाब का घातला, यावरून प्रश्न उपस्थित केले. ज्यामुळे तिला टीकेला सामोरे जावे लागले.

vicky jain- ankita lokhande
Dhinchak Pooja Wedding Buzz |‘ढिंच्याक पूजा’च्या लग्नाची चर्चा रंगली; व्हायरल व्हिडिओनंतर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

ट्रोल झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रश्नांचा भडीमार

एकीकडे चाहत्यांचे कौतुक दुसरीकडे ट्रोलसर्कडू प्रस्नांचा भडीमार. नेटकऱ्यांकडून अंकितासाठी संमिश्र प्रतिक्रिया आल्या. नेटकरी म्हणाले की, प्रवास करताना तिथल्या स्थानिक संस्कृतीचा आदर करणे आणि त्यानुसार पेहराव करणे याचे राजकारण होऊ नये किंवा त्यावर टीका होऊ नये.

हिजाब घातल्याबद्दल अंकिता लोखंडेवर टीका होण्याची ही पहिली वेळ नाही. २०२५ मध्ये, ती मुंबई विमानतळावर हिजाब घालून लोकांना 'अदाब' म्हणत अभिवादन करताना दिसली होती.

पवित्र रिश्तामुळे अंकिताला प्रचंड लोकप्रियता

२००९ ते २०१४ या काळात प्रसारित झालेल्या 'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय दूरदर्शन मालिकेतील अर्चनाच्या भूमिकेमुळे अंकिता लोखंडे घराघरात पोहोचली होती. नंतर, अंकिताने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाँसी' व 'बाघी ३' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तिने रिॲलिटी शोमध्येही काम केले. अंकिता आणि विकी यांचे लग्न १४ डिसेंबर २०२१ रोजी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news