

'उरी' फेम दिग्दर्शक आदित्य धरच्या 'धुरंधर २' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या संदर्भातील अभिनेता रणवीर सिंहचा एक कथित फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो डोक्यावर पगडी घालून सिगारेट ओढताना दिसत आहे. शीख धर्मात पगडी परिधान करून धूम्रपान करणे निषिद्ध मानले जात असल्याने, या फोटोमुळे धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची भीती निर्माण झाली. यावर दिग्दर्शक आदित्य धरने कडक शब्दांत आक्षेप घेत तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा फोटो खोटा (Fake/AI Generated) असून चित्रपटाची प्रतिमा डागाळण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक ही अफवा पसरवत असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
बॉलिवूडचा एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंह आणि 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' फेम राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आदित्य धरचा 'धुरंधर २' (Dhurandhar 2) सध्या मोठ्या चर्चेत आहे. मात्र, आता या चित्रपटाच्या नावाखाली एक नवा वाद सोशल मीडियावर उफाळून आला आहे. रणवीर सिंहचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने डोक्यावर पगडी बांधली आहे आणि तो सिगारेट ओढताना दिसत आहे. या फोटोवर आदित्य धर यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
आदित्य धरचा धुरंधर२: द रिव्हेंज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड नफा कमावत असून त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने सात दिवसांत अनेक विक्रम मोडले आहेत. चित्रपटाच्या यशाबद्दल आदित्य धरने प्रेक्षकांचे आभार मानले असले तरी, तो आता व्यथित झाला आहे. कारण आहे-मॉर्फ्ड फोटो.
गेल्या वर्षी 'धुरंधर' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यापासून, प्रेक्षक फक्त त्याच चित्रपटाबद्दल बोलत आहेत. सुरुवातीला अक्षय खन्नाच्या रहमान डकैतच्या भूमिकेतील स्वॅग आणि रणवीर सिंगच्या हमजा उर्फ जस्कीरतच्या भूमिकेतील दमदार अभिनयाने प्रेक्षक भारावून गेले होते. यानंतर दिग्दर्शक आदित्य धर यांनी उत्कृष्ट कथा सिक्वेलमध्ये आणली. सध्या 'धुरंधर द रिव्हेंज'साठी खूप कौतुक होताना दिसत आहे. धुरंधर २ मधील रणवीरचा एक फोटो व्हायरल झाला, ज्यात रणवीर पगडी घालून सिगारेट ओढताना दिसला.
आता या एआय फोटोवर आदित्य धरने प्रतिक्रिया दिली असून, हे सर्व खोटे असल्याचे म्हटले आहे आणि असे कृत्य करणाऱ्यांना कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. आदित्य धरने असेही म्हटले आहे की, तो शीख समुदायाचा खूप आदर करतो आणि चित्रपटातील प्रत्येक गोष्ट अत्यंत संवेदनशीलतेने चित्रित केली आहे. अशा परिस्थितीत, एआयद्वारे खोटे व्हिडिओ आणि चित्रे पसरवणाऱ्यांवर तो संतापला आहे आणि म्हणतो की, हे सर्व खोटे वृत्त पसरवण्यासाठी आणि वाद निर्माण करण्यासाठी केले जात आहे.
रणवीर सिंहची भूमिका असलेले पात्र जसकीरत सिंह रंगी पगडी घालून सिगरेट ओढतानाच्या फोटोवर शीख समुदायाच्या एका ग्रुपने नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी निर्मात्यांविरुद्ध आणि रणवीरविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. रणवीरसह 'धुरंधर २' च्या निर्मात्यांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. यानंतर आदित्य धरने एक मोठे पोस्टर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. ज्यामध्ये त्याने हा फोटो बनावट असल्याचे म्हटले आहे.
आदित्य धरने आपल्या पोस्टमध्ये काय लिहिले?
आदित्य धरने सांगितले की, काही लोक कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून चित्रपटाच्या अधिकृत प्रचार सामग्रीत फेरफार करत आहेत आणि खोटी माहिती पसरवत आहेत. त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आणि म्हटले की चित्रपटाला देश-विदेशातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण काही लोक हे चांगले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते चित्रपटाच्या प्रतिमेला हानी पोहोचवण्यासाठी मूळ फोटो आणि व्हिडिओ बदलून चुकीचा कंटेंट तयार करत आहेत. त्याने स्पष्ट केले की, हा फोटो पूर्णपणे खोटा आहे आणि चित्रपटाशी किंवा अधिकृत कंटेंटशी काहीही संबंध नाही. असे चुकीचे फोटो लोकांना भडकवण्यासाठी मुद्दाम तयार केले जात आहेत.