Operation Sindoor |पाकिस्तानला पुन्हा धूळ चारणार! विवेक अग्निहोत्री-भूषण कुमार आणताहेत 'ऑपरेशन सिंदूर', लष्कराच्या शौर्याची सत्य कथा!

Operation Sondoor Movie | भूषण कुमार-विवेक अग्निहोत्रीच्या 'ऑपरेशन सिंदूर'ची चर्चा
Operation Sondoor Movie
Operation Sondoor Movie announcement pudhari photo
Published on
Updated on
Summary

दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री आणि टी-सीरीजचे भूषण कुमार यांनी 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट लेफ्टनंट जनरल के. जे. एस. 'टायनी' ढिल्लों (निवृत्त) यांच्या पुस्तकावर आधारित असून, एप्रिल २०२५ च्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या गुप्त आणि अचूक लष्करी कारवाईची सत्यकथा यात दाखवली जाईल.

Operation Sondoor Movie announcement

भूषण कुमार आणि 'द काश्मीर फाइल्स' फेम दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी त्यांच्या नवीन चित्रपटाची अधिकृत घोषणा केली असून सोशल मीडियावर सध्या 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट भारतीय लष्कराच्या शौर्याची आणि एका सत्य घटनेची थरारक कथा प्रेक्षकांसमोर आणणार आहे.

Operation Sondoor Movie
Harry Potter सीरिजची पहिली झलक आली समोर; पाहा कोण आहेत नवे कलाकार?

निर्माता भूषण कुमार आणि चित्रपटनिर्माता विवेक रंजन अग्निहोत्री यांनी 'ऑपरेशन सिंदूर' या नवीन चित्रपटासाठी हातमिळवणी केली आहे. हा चित्रपट लेफ्टनंट जनरल के.जे.एस. ढिल्लन यांच्या 'ऑपरेशन सिंदूर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राईक्स इनसाईड पाकिस्तान' या पुस्तकावर आधारित आहे. दिग्दर्शन विवेक रंजन अग्निहोत्री करणार आहेत. २०२५ मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) दहशतवादी तळांवर केलेल्या गुप्त लष्करी कारवाईची (Deep Strikes) ही कथा आहे.

भूषण कुमार यांची 'टी-सीरीज' (T-Series) आणि विवेक रंजन अग्निहोत्री यांची 'आय ॲम बुद्धा प्रॉडक्शन्स' (I Am Buddha Productions) या निर्मिती संस्थांनी 'ऑपरेशन सिंदूर' या नवीन चित्रपटासाठीच्या आपल्या सहयोगाची घोषणा केली आहे.

Operation Sondoor Movie
Zubeen Garg Death Case |गायक जुबीन गर्ग यांचा सिंगापूर बेटावर 'अपघाताने बुडून' मृत्यू?

या महत्वाकांक्षी प्रोजेक्टसाठी भूषण कुमार आणि विवेक रंजन अग्निहोत्री हा चित्रपट केवळ कहाणी म्हणून नाही तर पाकिस्तानच्या न्यूक्लियर धमक्यांची पोलखोल करणार असल्याचे सांगितले जात आहे.

चित्रपटाची कहाणी ज्या पुस्तकावर (ऑपरेशन सिंदूर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राइक इनसाइड पाकिस्तान) आधारित आहे, ते पुस्तक त्या गुप्त सैन्य अभियानाची झलक देते. त्याची सामान्य जनतेला खूप कमी माहिती आहे. चित्रपट ही उजेडात नसलेल्या कहाणीला मोठ्या पडद्यावर आणत आहे. सखोल संशोधन करून चित्रपटाची कहाणी सर्वांसमोर येणार असल्याचा दावा निर्माते करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news