

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या बहुचर्चित चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे भरतची भूमिका साकारणार आहे. नुकतीच त्याच्या फर्स्ट लूकची झलक समोर आली असून त्याच्या राजेशाही आणि प्रभावी लूकचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
Ramayana Adinath Kothare role look
पाणी, चंद्रमुखी, 83, नीलकंठ मास्टर अशा अनेक चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता आदिनाथ कोठारे आता 'रामायण' चित्रपटात दिसणार आहे. अलिकडेच 'रामायण' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. बहुप्रतीक्षित हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्यामध्ये मराठमोळा अभिनतयची झलक पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. यामध्ये अभिनेता आदिनाथ कोठारेची खास झलक दाखवण्यात आली.
'रामायण'मध्ये तो प्रभू श्रीराम यांचा भाऊ भरत साकारणार आहे. आदिनाथचा अभिनय ट्रेलरमध्ये बघायला मिळतो. भरत यांच्या भूमिकेतील काही फोटोज देखील व्हायरल झाले. जेव्हा वनवासात असलेल्या प्रभू श्रीराम यांना भरत भेटायला येतो. तेव्हा प्रभू श्रीराम यांच्या सांगण्यावरुन भरत निघून जातात. पण जाताना श्रीरामांच्या पादुका ते सोबत घेऊन जातात. याच पादुका भरत अयोध्येच्या सिंहासनावर ठेवतात. हा अत्यंत भावुक करणारा हा प्रसंग ट्रेलरमध्ये दिसतो.
व्हायरल झालेल्या लूकमध्ये आदिनाथ कोठारे पारंपरिक राजेशाही पोशाखात दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील गंभीर भाव, शाही व्यक्तिमत्त्व आणि व्यक्तिरेखेला साजेसा अभिनय यामुळे हा लूक विशेष आहे. भरत यांच्या भूमिकेतील त्याचा हा अवतार पाहून अनेक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
'रामायण' हा सर्वात चर्चित चित्रपट मानला जात आहे. चित्रपटात भव्य सेट, अत्याधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्स आणि दमदार कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. यापूर्वी चित्रपटातील प्रमुख कलाकारांच्या लूकची झलकही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता आदिनाथ कोठारेच्या लूकने याची आणखी चर्चा होताना दिसतेय.
आदिनाथ कोठोरेचे चित्रपट -
आदिनाथ कोठारेचा जन्म १३ मे १९८४ रोजी झाला. त्यान बाल कलाकार म्हणूम माझा छकुला या चित्रपटात काम केले. या चित्रपटातील त्याच्या या भूमिकेचे कौतुक खूप झाले होते. वेड लावी जीवा, नीळकंठ मास्तर, ८३, पंचक, सतरंगी रे, झपाटलेला २ अशा अनेक मराठी, हिंदी चित्रपटात त्याचा अभिनय पाहायला मिळाला आहे.