Jana Nayagan BO Collection | 'जन नायकन'ने उडवला धुव्वा; थलपथी विजयचा चित्रपट जगभरात ३०० कोटींच्या जवळ

Jana Nayagan BO Collection| 'जन नायकन'ने उडवला धुव्वा; थलपथी विजयचा चित्रपट जगभरात ३०० कोटींच्या जवळ
thalapathy vijay - pooja hegde
thalapathy vijay starrer movie Jana Nayagan Box Office Collection day 11 pudhari photo
Published on
Updated on
Summary

थलपथी विजयचा 'जन नायकन' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. देशांतर्गत आणि परदेशातील उत्कृष्ट प्रतिसादामुळे चित्रपटाची जागतिक कमाई आता ३०० कोटी रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. विजयच्या दमदार अभिनयासह चित्रपटाची कथा, अॅक्शन आणि संगीत प्रेक्षकांना भावत असल्याने थिएटरमध्ये मोठी गर्दी होत आहे.

थलपती विजय यांच्या जन नायकन या चित्रपटाने तब्बल २८० कोटींचा टप्पा ओलांडला. विकेंडचा फायदा या चित्रपटाला खूप झाला. रविवारी तब्बल ८ कोटींहून अधिक कमाई तिकिटी बारीवर झाली आहे. चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील दमदार घोडदौड सुरूच असून दुसऱ्या शनिवारी या चित्रपटाने ९.७५ कोटी रुपयांची कमाई केली. शुक्रवारच्या तुलनेत ही कमाई अधिक आहे असून भारतात एकूण ९ दिवसात (ग्रॉस कलेक्शन) १९२.७५ कोटी रुपये चित्रपटाने कमावले. तर जगभरात कमाईने किती आकडा गाठला आहे, हे पाहुया.

'जन नायकन'मध्ये थलपथी विजयचा दमदार अभिनय, मोठ्या प्रमाणावर सादर करण्यात आलेली अॅक्शन, भावनिक कथानक आणि आकर्षक संगीत यामुळे प्रेक्षक चित्रपटाकडे आकर्षित होत आहेत. सोशल मीडियावरही चित्रपटातील अनेक दृश्ये, संवाद आणि गाण्यांची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन एच. विनोथ यांनी केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ९ व्या दिवषी ३.५५ कोटी रुपये तर १० व्या दिवशी चित्रपटाने भारतात ७.८० कोटी रुपयांची नेट कमाई केली. ११ व्या दिवशी भारतात १०.७० कोटी रुपयांची नेट कमाई केली. आतापर्यंत भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन २०४.९२ कोटी रुपये इतकी झाली आहे.

thalapathy vijay - pooja hegde
Samreen Kaur: मिस इंडिया फायनलिस्ट आणि कोट्यवधींची संपत्ती; अर्शदीपची गर्लफ्रेंड समरीन काय करते? पुण्याशी आहे खास कनेक्शन

तर जगभरात या कमाईचा आकडा २८०.५० कोटी रुपयांवर पोहोचला. तो ३०० कोटी रुपयांचा टप्पा गाठण्यापासून अवघ्या काही कोटींच्या अंतरावर आहे. चित्रपटाच्या कमाईमध्ये तमिळ भाषेतील सर्वाधिक कमाई आहे.

thalapathy vijay - pooja hegde
Spider Man Box Office: 'स्पायडर-मॅन'चा बॉक्स ऑफिसवर धडाका; 'पठाण', 'टायगर' आणि 'धुरंधर'लाही टाकलं मागे, किती कोटी कमावले?

ट्रेड विश्लेषकांच्या मते, चित्रपट लवकरच ३०० कोटी रुपयांचा जागतिक टप्पा पार करू शकतो. त्यानंतरही त्याची कमाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या काही दिवसांत 'जन नायकन' ३०० कोटींचा आकडा पार करतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर सध्याचा कमाईचा वेग कायम राहिला, तर हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत आपले स्थान नक्कीच पक्के करू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news