

‘KGF’ नंतर यश ‘Toxic’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर एका अत्यंत खतरनाक आणि वेगळ्या भूमिकेत येत आहे. Raya या कॅरेक्टरमध्ये यशचा लूक, बॉडी लँग्वेज आणि अॅक्शन सीन्स अंगावर काटा आणणारे आहेत. नुकताच रिलीज झालेल्या टीजरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून, हा चित्रपट यशच्या करिअरमधील सर्वात डार्क आणि दमदार प्रोजेक्ट ठरणार असल्याची चर्चा आहे.
Yash Toxic The Movie teaser out now
साऊथ केजीएफ स्टार यशच्या टॉक्सिक चित्रपटाचा टीझर गुरुवारी त्याच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित करण्यात आला. त्यातील थक्क करणारे सीन्स पाहून फॅन्सना प्रश्न पडला आहे की, ही कथा कशी असेल? काहींनी त्याची तुलना "धुरंधर" शी केली, तर काहींनी ती हॉलिवूड चित्रपटाशी तुलना केली. या टीझरला रिलीज होताच प्रचंड लोकप्रियता मिळाली. रिलीज झाल्यानंतर काही मिनिटांतच याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला.
यशच्या व्यक्तिरेखेबद्दल, चित्रपटाच्या कथेबद्दल आणि त्यातील खतरनाक सीन्सबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे. यशच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित झाल्याने या टीझरचे महत्त्व वाढले आहे, एक्स अकाऊंटवर #Raya ट्रेंड होत असून सोशल मीडियावर त्याची जोरदार र्चा सुरू आहे.
'राया'चा अर्थ शोधत आहेत फॅन्स
चित्रपटामध्ये यशची भूमिका राया असल्याचे म्हटले जात आहे. मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये या शब्दाला राजा वा रॉयल्टी म्हटले जाते.
टॉक्सिक स्टार कास्ट आणि बजेट
दिग्दर्शिका गीतू मोहनदासचा फिल्म टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्समध्ये यश सोबत रुक्मिणी वसंत, नयनतारा, कियारा आडवाणी, तारा सुतारिया, हुमा कुरैशी, अक्षय ओबेरॉय, सुदेव नायर, अमित तिवारी, टोविनो थॉमस महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. रिपोर्ट्सनुसार, चित्रपट २००-३०० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आले आहे.
यशचा टॉक्सिक टीजर
सुपरस्टार यशचा आज ८ जानेवारी रोजी बर्थडेच्या निमित्ताने निर्मात्यांनी त्याचा आगामी चित्रपट टॉक्सिकचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. यशने आपल्या इन्स्टाग्रामवर टीजर शेअर केला आहे. त्याने लिहिलंय- राया, टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन अप्स, १९ मार्च २०२६ ला जगभरात चित्रपटगृहांमध्ये रिलीज होईल.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजीव रवि यांची सिनेमॅटोग्राफी, संगीत रवि बस्रूर, एडिटिंग उज्ज्वल कुलकर्णी, प्रोडक्शन डिझाईन टीपी आबिद यांचे आहे. हॉलीवूड ॲक्शन डायरेक्टर जेजे पेरी, राष्ट्रीय पुरस्कार विजेती जोडी अंबरिव - केचा खाम्फाकडी यांची कोरिओग्राफी आहे.
प्रेक्षकांच्या टॉक्सिक टीजरवर आल्या प्रतिक्रिया
टीजर पाहून एखा युजरने लिहिलं - वाढदिवसाच्या शुभेच्छा रॉकिंग स्टार यश. ओरकू नावाच्या युजरने लिहिलं - टॉक्सिकचा टीजर पाहून आता धुरंधरसाठी वाईट वाटत आहे. हे लिहून घ्या ...ऑल टाईम ब्लॉकबस्टर चित्रपट असेल.