Rishabh Met PM Modi
Rishabh Met PM Modi

Rishabh Met PM Modi : केजीएफ स्टार यश-कांतारा फेम ऋषभ शेट्टीने घेतली मोदींची भेट

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क :'केजीएफ' साऊथ स्टार यश आणि 'कांतारा' फेम अभिनेता ऋषभ शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खास भेट घेतली आहे. ( Rishabh Met PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी कर्नाटक दौऱ्यावर होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे नुकतेच कर्नाटक दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान केजीएफ (KGF) फेम अभिनेता यश आणि कांतारा फेम अभिनेता ऋषभ शेट्टी यांच्यासह होम्बल फिल्म्सची टिम, निर्माते विजय किरगंडूर आणि अश्विनी पुनीत राजकुमार यांनी त्यांची भेट घेतली. ( Rishabh Met PM Modi)

या बैठकीत त्यांनी मनोरंजन क्षेत्रातील अनेक पैलूंवर चर्चा केली. यात त्यांनी राज्यातील चित्रपटगृहांची संख्या, चित्रपटांवर होणारा परिणाम आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना कशी मिळेल या सगळ्या गोष्टीचा खुलासा केला. यानंतर संपुर्ण टीमने नरेंद्र मोदींसोबत एक फोटो काढला. हा फोटो सोशस मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. 'केजीएफ चॅप्टर २' आणि 'कांतारा' यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपट होम्बले फिल्म्सने दिले आहे.

'कांतारा' प्रीक्वलची घोषणा

'कांतारा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोष कमाई करत १०० दिवसांटा टप्पा पूर्ण केल्याने होम्बल फिल्म्सचे कौतुक केलं जात आहे. यादरम्यान चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यांनी 'कांतारा' च्या प्रीक्वलची घोषणा केली आहे. तसेच होंबळे फिल्म्स त्याच्या आणखी एका मोठ्या प्रकल्प 'सालार' चित्रपटाच्या तयारीत लागला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news