Rajinikanth's film Dharman |'रक्ताने माखलेला हात, स्मितहास्य अन्..' रजनीकांत यांच्या ‘धर्मन’चा खतरनाक फर्स्ट लूक पाहाच

Rajinikanth's 173rd film Dharman | 'रक्ताने माखलेला हात, स्मितहास्य अन्..' रजनीकांत यांच्या ‘धर्मन’चा फर्स्ट लूक; खतरनाक लूक पाहाच
Rajinikanth's 173rd film Dharman
Rajinikanth's 173rd film Dharmanpudhari photo
Published on
Updated on
Summary

सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाचे अधिकृत नाव ‘धर्मन’ असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दिग्दर्शक अश्वथ मारीमुथू यांच्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यामध्ये रजनीकांत यांचा दमदार आणि रहस्यमय अवतार पाहायला मिळत आहे. कमल हासन यांच्या निर्मितीखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

अश्वथ मारीमुथू यांचा धर्मन हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. थलाईवा रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेला या चित्रपटाचा सध्या फर्स्ट लूक रिलीज झालाय. के .एस. रविकुमार, सुंदर सी. आणि सिबी चक्रवर्ती यांच्यानंतर, कमल हसन यांच्यासोबतच्या रजनीकांत यांच्या 'धर्मन' या चित्रपटासाठी अश्वथ मारीमुथू यांची दिग्दर्शक म्हणून निवड झाली. आता या चित्रपटाचे लवकरच चित्रीकरण सुरु होणार असल्याची माहिती समोर आलीय.

Rajinikanth's 173rd film Dharman
Trisha Krishnan| त्रिशाच्या पोस्टने सर्वांची बोलती बंद; वाढदिवशी शुभेच्छा नाहीत म्हणून चर्चा, पण दुसऱ्याच दिवशी दिलं मोठं सरप्राईज

धर्मन फर्स्ट लूक

कमल हसन यांच्या चित्रपटात अभिनेते रजनीकांत एका 'किलर' वृत्तीच्या डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. कमल हसन यांच्या 'राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल'ने 'धर्मन - द डेडली डॉक्टर' (The Deadly Doctor) या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित केला आहे. यामध्ये रजनीकांत डॉक्टरच्या अवतारात दिसताहेत. त्यांच्या रक्ताने माखलेल्या हातात एक 'स्कॅल्पेल' (शस्त्रक्रियेचे साधन) आहे. चेहऱ्यावरील स्मितहास्य, डोळ्यावर गॉगल आणि ऑपरेशन थिएटरमध्ये उभ्या असलेल्या रजनीकांत यांची या चित्रपटाची कथा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोन महानायकांचा संगम

हा रजनीकांत यांचा १७३ वा चित्रपट आहे. तसेच रजनीकांत आणि कमल हासन हे दोन महानायक मिळून हा चित्रपट करताहेत. निर्मात्यांनी या चित्रपटाबद्दलची कथा अद्याप सांगितलेली नाही. पण पोस्टरवरील रजनीकांत यांच्या लूकची चर्चा अधिक रंगलीय.

निर्मात्यांनी हे पोस्टर "धर्ममे वेल्लुम" (Dharmame Vellum) या कॅप्शनसह रिलीज केले आहे. याचा ढोबळ अर्थ "न्यायाचाच विजय होईल" असा होतो. मीडिया रिपोर्टनुसार, बुधवारी चेन्नईमध्ये कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत चित्रपटाचा पूजा समारंभ पार पडला. चित्रपटाच्या चित्रीकरणाला २५ जूनपासून सुरुवात होणार आहे.

२०२५ मध्ये पहिल्यांदा घोषणा झाली होती की, 'धर्मन'चे दिग्दर्शन सुंदर सी. करणार आहेत. नंतर दिग्दर्शक सिबी चक्रवर्ती आणि आता अश्वथ मारिमुथू या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. रजनीकांत २०२५ मध्ये 'कुली' चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात नागार्जुन अक्किनेनी, उपेंद्र, श्रुती हासन, सौबिन साहीर, सत्यराज, रचिता राम, पूजा हेगडे यांच्या भूमिका होत्या.

Rajinikanth's 173rd film Dharman
Padma Awards 2026|'सुरांच्या राणी'चा सन्मान! अलका याज्ञिक पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news