Trisha Krishnan| त्रिशाच्या पोस्टने सर्वांची बोलती बंद; वाढदिवशी शुभेच्छा नाहीत म्हणून चर्चा, पण दुसऱ्याच दिवशी दिलं मोठं सरप्राईज

Trisha Krishnan-Vijay Joseph | त्रिशाच्या एका पोस्टने सर्वांची बोलती बंद; वाढदिवशी शुभेच्छा नाहीत म्हणून चर्चा, पण दुसऱ्याच दिवशी त्रिशाने दिला मोठा सरप्राईज
Trisha Krishnan-Vijay Joseph
Trisha Krishnan celebrate Vijay Joseph birthday with beautiful cake pudhari photo
Published on
Updated on
Summary

२२ जून रोजी विजय यांच्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त त्रिशा कृष्णनकडून कोणतीही शुभेच्छा न आल्याने चाहत्यांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र दुसऱ्याच दिवशी त्रिशाने विजयसोबतचा खास सेलिब्रेशनचा फोटो शेअर करत, “ज्या व्यक्तीमुळे हे सर्व काही खास आणि अर्थपूर्ण वाटते, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा,” असा भावनिक संदेश दिला. तिच्या या पोस्टने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून चाहत्यांनीही या क्षणावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

२२ जून रोजी माजी अभिनेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी आपला ५२ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी देशभरातील चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र अभिनेत्री त्रिशा कृष्णनकडून कोणतीही प्रतिक्रिया किंवा सोशल मीडिया पोस्ट न आल्याने चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली होती.

विजय आणि त्रिशा यांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असून त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांमध्ये नेहमीच लोकप्रिय राहिली आहे. त्यामुळे विजय यांच्या वाढदिवशी त्रिशा काहीतरी खास पोस्ट करेल, अशी अपेक्षा अनेकांना होती. परंतु दिवसभर तिच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने सोशल मीडियावर विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली.

मात्र या चर्चांना दुसऱ्याच दिवशी पूर्णविराम मिळाला. त्रिशा कृष्णनने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर विजयसोबतचा एक खास फोटो शेअर केला. या फोटोमध्ये केक, आनंदी वातावरण आणि दोघांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहायला मिळत आहे. या फोटोसोबत तिने लिहिलेला संदेश विशेष चर्चेचा विषय ठरला.

Trisha Krishnan-Vijay Joseph
Emraan Hashmi : इमरान हाश्मीची ‘सिरियल किसर’ प्रतिमा होती नियोजित पीआर मोहिमेचा भाग; पब्लिसिस्टचा खुलासा

“ज्या व्यक्तीमुळे हे सर्व काही खास आणि अर्थपूर्ण वाटते, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा,” असे भावनिक शब्द वापरत त्रिशाने विजय यांना शुभेच्छा दिल्या. तिने फोटो आणि कॅप्शन इन्स्टाग्रामवर शेअर केली. तिच्या या पोस्टने काही मिनिटांतच सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता मिळवली. चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सच्या माध्यमातून या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या.

या तिच्या एका पोस्टने सर्वांची बोलती बंद केली. दोघांनीही आपल्या नातयाबाबत उघडपणे सांगितले नसले तरी, त्रिशाच्या या इन्स्टाग्राम पोस्टवरून तर्क-वितर्क लावले जात आहेत.

विजय सध्या राजकारणात सक्रिय आहेत. दुसरीकडे, त्रिशा कृष्णनही दक्षिण चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. दोघांची लोकप्रियता प्रचंड असल्याने त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट्स नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.

Trisha Krishnan-Vijay Joseph
Padma Awards 2026|'सुरांच्या राणी'चा सन्मान! अलका याज्ञिक पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

त्रिशाने शेअर केलेला हा फोटो आणि तिचा भावनिक संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाढदिवशी शांत राहिल्यामुळे निर्माण झालेल्या चर्चांना या एका पोस्टने पूर्णविराम मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news